Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?
Paleoanthropology In future : येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवी शरिरावर दिसून येईल, यात काही शंका नाही.
Scientific study of human evolution: मानवी उत्क्रांतीचा इतिहास (history of human evolution) पाहिला तर मानवी शरिरात शेकडो बदल होत गेलेत. माणसाचं शेपूट गायब झालं, मणक्याचा पोक गेला. असेच महत्त्वाचे बदल मानवी शरिरात पुढच्या 100 वर्षात घडतील असा अभ्यास समोर आलाय. अपघात, धडपडणं, जीवनशैली यामुळे थेट मानवी शरिरावर परिणाम होत असतो. त्यातूनच माणसाच्या शरिरात (Human Body) नवीन बदल घडून येतील, असं हा अभ्यास (Scientific study of human evolution) सांगतो. अशातच एक अहवाल समोर आहे. (Paleoanthropology scientific study of human evolution Harvard University What will the man of the future look like marathi news)
शेफील्ड आणि हार्वर्ड विद्यापीठानं (Harvard University) पुढच्या काही वर्षात मानवी शरिरात होणाऱ्या संभाव्य बदलांचा अहवाल जारी केलाय. या अहवालानुसार (Scientific Report) काही महत्त्वाची समोर आली आहे.
भविष्यातला माणूस कसा दिसेल (What will the man of the future look like) ?
माणसाचे दात (Teeth) चोचीसारखे होतील. माणसाची उंची वाढेल, सरासरी उंची 5.10 फूट होईल, एखाद्या बास्केटबॉल खेळाडूसारखा दिसेल. फुफ्फुसं मजबूत होतील, जास्त ऑक्सिजन खेचू शकतील. टायपिंग आणि टचस्क्रिनसारखी यंत्र वापरुन वापरुन मानवी बोटं लांबसडक होतील. माणूस तुलनेनं अधिक जाड दिसायला लागेल, असंही अहवालातून समोर आलंय.
सरडा जसा रंग बदलतो तसा माणसाच्या मूडप्रमाणे त्वचेचा रंग (Skin Color) बदलला जाईल. माणूस अधिक तरुण दिसायला लागेल, 50 वर्षांचा माणूस 30 वर्षांचा दिसेल. माणूस अमर होईल, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे (Artificial Intelligence) प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता जिवंत ठेवली जाईल, असंही भाकित वर्तविण्यात आलंय.
दरम्यान, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात (Stages of human evolution) मानवी शरीरात अनेक बदल झालेत. जीवनशैली, वातावरणीय बदलामुळे असेच बदल भविष्यातही होत राहतील. आता हे बदल सकारात्मक असतील की नकारात्मक, त्यामुळे माणसाचा फायदा होईल की नुकसान याचा अंदाज आता लावणं अवघड आहे. येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे.