जीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट
येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.
मुंबई : येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.
पेटीएम आणि अमेझॉनवर आयफोन ७ पासून इतर अनेक मोबाईल ब्रॅन्डवर हजारो रुपयांची कॅशबॅक ऑफर सध्या दिसतेय.
तुम्हालाही स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल तर ३० जूनपूर्वी तुम्हीही या संधीचा लाभ घेऊ शकाल. पेटीएममध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर १५ टक्क्यांची सूट मिळतेय.
पेटीएमवर ७०,००० रुपयांच्या आयफोन-७ (१२८ जीबी) वर २४ टक्क्यांचा डिस्काऊंट मिळतोय. तर आयफोन-७ (३२ जीबी) केवळ ४६,१८२ रुपयांना उपलब्ध होतोय.
आयफोन-६एस (३२ जीबी) डिस्काऊंटनंतर ३६,६६६ रुपयांत उपलब्ध आहे. तर आयफोन-५ एससाठी ग्राहकांना केवळ २७,२८५ रुपये मोजावे लागणार आहेत.
अमेझॉनवरही आयफोन-७ आणि आयफोन-७ प्लसवर १६,००० रुपयांपर्यंतची सूट मिळतेय.