मुंबई : मोबाईल चोरीला गेला, स्क्रीन तुटली किंवा अगदी थेट पाण्यात पडला तर तो पुन्हा सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरतात. पण जर तुम्ही पेटीएममधून फोन  विकत घेतला तर मात्र तुम्हांला मदत मिळू शकते अशी माहिति पेटीएमने दिली आहे.  


1 वर्षांचं प्रोटेक्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएम मॉल मधून तुम्ही स्मार्ट फोन विकत घेतला असेल तर 'मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन'  मिळणार आहे. या प्लॅनमुळे एका वर्षासाठी स्क्रीन डॅमेज, लिक्विड डॅमेज,अ‍ॅक्सिडंट डॅमेज सारखे फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमुळे अनेक महागडे फोन ग्राहकांना सुरक्षित ठेवणं आणि वापरणं सुकर होणार आहे. 


सशुल्क असणार ही सुविधा  


स्मार्टफोनबरोबर हा प्रोटेक्शन प्लॅन घेणं ही सशुल्क सेवा असेल. त्यासाठी स्मार्टफोनच्या ५ % रक्कम देणं गरजेचे आहे. सार्‍याच आघाडीच्या स्मार्टफोनसाठी ही स्कीम लागू असेल. 


कसा घ्याल फायदा  ? 



ग्राहकांना यासाठी एका टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. त्यानंतर काही दुरूस्ती असेल तर घरातून फोन पिक अप केला जाईल. तसेच दुरूस्त झाल्यावर ग्राहकाला तो घेऊन जावा लागेल. जर फोन रिपेअर करणं शक्य नसेल तर त्याची किंमत दिली जाईल.