Paytm मॉलवर सेल सुरू, १०० टक्के कॅशबॅकसोबत मिळणार १०० ग्रॅम गोल्ड
उत्सवांचा सीझन पाहता पेटीएमने आजपासून(बुधवारी) ‘मेरा कॅशबॅक सेल’ सुरू केला आहे. २० ते २३ सप्टेंबरला दरम्यान हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये ग्राहकांना ५०१ कोटी रूपयांचं सुनिश्चित कॅशबॅक दिलं जाणार आहे.
नवी दिल्ली : उत्सवांचा सीझन पाहता पेटीएमने आजपासून(बुधवारी) ‘मेरा कॅशबॅक सेल’ सुरू केला आहे. २० ते २३ सप्टेंबरला दरम्यान हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये ग्राहकांना ५०१ कोटी रूपयांचं सुनिश्चित कॅशबॅक दिलं जाणार आहे.
असा कंपनीने दावा केलाय. इतकेच नाही तर या प्लॅटफॉर्मवरून दररोज २५ स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक आणि २०० ग्राहकांना प्रति दिवस १०० ग्रॅम पेटीएम गोल्डही मिळणार आहे. यासोबतच कपडे, शूज आणि लॅपटॉपवरही अनेक शानदार ऑफर्स आहेत.
या चार दिवसांच्या सेलमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक यूजर्स येतील अशी आशा कंपनीला आहे. पेटीएम मॉलच्या ‘मेरा कॅशबॅक सेल’मध्ये अॅपल, सॅमसंग, एलजी, ओप्पो, व्हिवो, सोनी, एचपी, लिनोओ, जेबीएल, फिलिप्स, प्यूमा, अॅलेन सॉली, ली, पेपे, लिवाईज, किलर, वान ह्यूसेन, अॅक्शन, वुडलॅंड, कॅटवॉक, स्केचर्स, रेड टेप, क्रॉक्स, टायमॅक्स, सफारी, लॅवी, कॅप्रीज यांच्यासह अनेक ब्रॅन्ड सहभागी होणार आहेत.
इतके ब्रॅन्ड असल्या कारणाने ग्राहकांना शॉपिंगसाठी अनेक ऑप्शन्स मिळतील. सोबतच क्वालिटीबद्दलही त्यांना काही अडचण नसणार. कारण ऑर्डरची डिलिव्हरी ग्राहकांच्या जवळचे अधिकॄत ब्रॅन्ड स्टोर्स किंवा दुकानदारच करणार आहेत.