Paytm सोबत सुरु करा तुमचा बिझनेस, होईल लाखोंची कमाई
Free मध्ये सुरु करा बिझनेस
नवी दिल्ली : पेटीएमचा वापर तुम्ही खरेदी करण्यासाठी किंवा व्यवहारासाठी करत असालच. पण, Paytmच्या माध्यमातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता हे तुम्हाला माहिती आहे का? होय. तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून चांगली कमाई करु शकता आणि त्यासोबतच तुमचा व्यवसायही सुरु करु शकता. पाहूयात सविस्तर वृत्त...
Paytm ने आपल्या ग्राहकांना बिझनेस पार्टनर बनण्याची एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच तुमचा नवा व्यापार किंवा जुना व्यवसायही पेटीएमच्या माध्यमातून वाढवू शकणार आहात.
मिळणार आकर्षक कमिशन
पेटीएमने आपली पेमेंट बँक सुरु केली आहे आणि पेटीएम पेमेंट बँकेद्वारे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी देशभरात एजेंटची नेमणूक केली जात आहे. त्यांना पेटीएम पेमेंट बँक 'बीसी' एजंट असं म्हटलं जातं. हे एजंट पेटीएम प्रोडक्ट्स विकणार असून त्या बदल्यात पेटीएमद्वारे त्यांना आकर्षक कमिशन देण्यात येणार आहे.
पेटीएम Seller
जर तुम्ही पेटीएमसोबत मिळून आपला व्यवसाय करु इच्छिता तर तुम्हाला पेटीएम Seller बनावं लागेल. पेटीएमने Paytm Mall नावाने ऑनलाईन शॉपिंग सुरु केली होती. जर तुम्ही Paytm Mall चे Seller बनले तर तुम्ही चांगली कमाई करु शकता. पेटीएम ग्राहकांची संख्या जवळपास ८ कोटींच्या घरात आहे. जर तुम्ही पेटीएमसोबत मिळून तुमचे प्रोडक्ट्स ८ कोटी युजर्स पर्यंत पोहचवू शकता.
फ्री मध्ये सुरु करा बिझनेस
पेटीएम Seller बनण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाहीये. पेटीएम यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही. तुम्हाला केवळ पेटीएम अॅप किंवा वेबसाईटवरुन साईन अप करायचं आहे आणि त्यानंतर आपले प्रोडक्ट्स किंवा सर्विसेसी यादी अपलोड करायची आहे. मग, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सची विक्री सुरु करु शकता.
Paytm एजंट बना
काही दिवसांपूर्वीच पेटीएमने आपली पेमेंट बँक सुरु केली होती. त्यानंतर आता ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पेटीएम पेमेंट बँक देशभरात एजंटची नेमणूक करत आहे. या एजंटचं काम पेटीएम प्रोडक्ट्स विकणं आहे. या बदल्यात पेटीएमद्वारे आकर्षक कमिशन दिलं जाणार आहे.
एजंट बनण्यासाठी काय करावं?
तुम्हाला पेटीएम एजंट बनण्यासाठी कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाहीये. यासाठी केवळ काही रोख रक्कम, अँड्राईड स्मार्टफोन, बायोमॅट्रिक डिव्हाईसची आवश्यकता आहे. याच्या माध्यमातून तुम्ही एजंट बनून पेटीएमसाठी काम करु शकता. पेटीएम बनण्याच्या संपूर्ण माहितीसाठी https://paytm.com/offer/bc-faqs/ या लिंकवर क्लिक करा.
असे बना पार्टनर
जर तुम्ही पेटीएमचे पार्टनर बनू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला https://paytm.com/about-us/partner-with-us-2/ या लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागले. अशा प्रकारे तुम्ही पेटीएम पार्टनर बनत काम करु शकता.