पेटीएम देणार `ही` नवी सुविधा!
मोबाईल वॉलेट पेटीएमने भीम यूपीआय सेवा सुरु केली आहे.
नवी दिल्ली : मोबाईल वॉलेट पेटीएमने भीम यूपीआय सेवा सुरु केली आहे. ही सुविधा पेटीएम पेमेंट्स बँकेतर्फे दिली जात आहे. पेटीएमने सांगितले की, या सुविधेचा लाभ पेटीएमच्या प्रत्येक युजरला मिळेल. फक्त त्यासाठी युजर्संना बँक खाते पेटीएम भीम यूपीआय अॅपशी लिंक करावे लागेल. यामुळे ते ट्रान्सझ्याक्शन सुरु करू शकतील. पेटीएम भीम यूपीआयवर सगळे बँक खाते व भीम यूपीआय अॅप्स स्विकारले जातील.
पेटीएम अॅपवर यूपीआयडी बनवण्यासाठी युजर्सला अॅपच्या होम स्क्रीनवर भीम यूपीआय सेक्शन बनवावे लागेल. येथे तुमचा आयडी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल. या सेक्शनअंतर्गत युजर्स आपल्या असलेल्या बचत खात्यातून आपले पेटीएम भीम यूपीआय लिंक करू शकतात. या फीचरचा प्रीव्हू सध्या अॅनरॉईड अॅपवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हे फीचर आयओएस वर देखील उपलब्ध करून देईल.
पेटीएम भीम यूपीआय अॅपवरून युजर्स दोन बँक खात्यांतमध्ये हव्या तितक्या वेळा फंड ट्रान्सफर करू शकतात. जिथे युजर्सला बेनेफिसियरी अॅड करण्यासाठी वाट पाहण्याची गरज भासणार नाही. मात्र त्यांना पैसे मिळवण्यासाठी बँक खात्याची माहिती व आयएफएससी कोड देने आवश्यक असेल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ५० लाख बिजनेस पार्टनर्सना पेटीएम भीम यूपीआय आयडी बनवण्याचे आणि वापरण्याचे ट्रेनिंग देईल. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना पेटीएम भीम यूपीआय आयडी सोबत बँक खाते लिंक करण्याचे आणि आपल्या बँक खात्यात पैसे स्विकारण्यासाठी सवलत देईल.