मुंबई : जपानच्या सॉफ्टबॅंक आणि चीनची अलिबाबाने पेटीएम मॉलमध्ये २९०० कोटी रुपायांची गुंतवणूक केली आहे. यामुळेच पेटीएम फ्लिपकार्ड आणि अॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. पेटीएम मॉलची व्हॅल्यू सुमारे १३००० कोटी रुपये आहे. पेटीएमचे सिईओ अमित सिन्हा यांनी सांगितले की, सॉफ्टबॅंक आणि अलिबाबासोबत कंपनीला फायदा होईल. कंपनीचे बिजनेस मॉडल मजबूतत असेल. अशावेळी जर तुम्हालाही पेटीएम सोबत बिजनेस सुरु करायचा असेल तर ही योग्य वेळ आहे. जाणून घ्या पेटीएमचे बिजनेस पार्टनर कसे बनाल...


पेटीएमवर व्हा सेलर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमसोबत बिजनेस करण्यासाठी पेटीएमचे सेलर व्हा. त्यातून तुमची चांगली कमाई होईल. पेटीएम सुमारे ८ लाख लोकांपर्यंत पोहचलेले आहे. त्यामुळे पेटीएमशी जोडले गेल्यास तुमचे प्रॉडक्ट ८ कोटी युजर्सपर्यंत पोहचतील.


फ्री मध्ये सुरू होईल बिजनेस


पेटीएम चे सेलर होण्यासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची नाही आहे. त्याचबरोबर पेटीएम यासाठी तुमच्याकडून कोणताही चार्ज घेत नाही. तुम्हाला फक्त पेटीएमच्या अॅप किंवा वेबसाईटवर साईन अप करायचे आहे. आणि तुमच्या प्रॉड्क्ट किंवा सर्व्हिसचे कॅटलॉग अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची विक्री सुरू करु शकता.


पेटीएमचे एजेंट व्हा


काही दिवसांपूर्वी पेटीएमने आपली पेमेंट बॅंक सुरु केली आहे. ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठई पेटीएम पेमेंट बॅंक देशभरात एजेंट बनवत आहेत. या पेटीएम एजेंट्सना पेमेंट बॅंक बीसी एजेंटचे नाव देण्यात आले आहे. या एजेंट्सचे काम पेटीएम प्रॉड्क्स विकण्याचे असेल. याबदल्यात तुम्हाला आकर्षक कमिशन मिळेल. यातून तुमची चांगली कमाई होईल.


असे होऊ शकता एजेंट


तुम्हाला एजेंट होण्यासाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करायची नाही आहे. या कामासाठी फक्त काही कॅश, अॅनरॉईड स्मार्टफोन, बायोमेट्रीक डिव्हाईस यांची गरज आहे. त्यानंतर तुम्ही एजेंट म्हणून पेटीएमसाठी काम सुरु करु शकता. यासाठीची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. https://paytm.com/offer/bc-faqs/ 


असे होऊ शकता पार्टनर


पेटीएमचे पार्टनर होण्याची इच्छा असल्यास या https://paytm.com/about-us/partner-with-us-2/ लिंकवर क्लिक करुन तुमची माहिती शेअर करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही पार्टनर म्हणून काम सुरु करु शकता.