मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. अशावेळी सर्वाधिक लोकं हे वर्क फ्रॉम होम करत आहेत. इंटरनेटवर काम करणं जितकं सोप आहे तितकंच ते खतरनाक देखील आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना कायमच सायब्रर क्राइमचा धोका असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर ऑनलाईन नोकरी शोधणं अनेकांना महागात पडलं आहे. ऑनलाईन इंटेलिजेंस फर्मने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सायब्रर क्राइमचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये तब्बल २.९ करोड भारतीयांचा खासगी डेटा मोफत डार्क वेबवर लीक करण्यात आला आहे. यामार्फत डेटा कुणीही डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकतो.


Cyble नावाच्या कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की,'नोकरीच्या शोधात असलेल्या २.९ करोड जनतेचा डेटा लीक झाला आहे. आतापर्यंत अनेकदा डेटा लीक होतो. मात्र हा डेटा अत्यंत खासगी स्वरूपाचा आहे. यामध्ये त्या व्यक्तीचं शिक्षण आणि त्याचा राहता पत्ता देखील लीक झाला आहे.' यामुळे याचा धोका सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात आहे. 


कंपनीने या अगोदर हँकिंगबाबत मोठा खुलासा केला होता. फेसबुक आणि सिकोइयाच्या हँकिंगची माहिती दिली होती. यामध्ये अतिशय संवेदनशील माहिती जशी की ईमेल, फोन नंबर, घरचा पत्ता, शैक्षणिक योग्यता, कार्याचा अनुभव यासारख्या गोष्टींचा समावेश होता. 



या ब्लॉगमध्ये २.३ जीबीची एक फाइल स्क्रीनशॉट स्वरूपात शेअर केली आहे. ज्याला एका हँकिंग फोरमवर पोस्ट केली आहे. ब्लॉगमध्ये पुढे म्हटलं आहे की, 'असं वाटतं की, ही माहिती रिझ्यूम एग्रीगेटरमधून काढण्यात आली आहे. ज्यामध्ये खूप खासगी माहिती दिलेली आहे. नवीन माहिती मिळाल्यावर आणखी विस्तृतपणे काही गोष्टी मांडता येतील.'