PMV EaS-E Micro Electric Car: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असून गेल्या काही वर्षात खपही चांगलाच वाढला आहे. असं असलं तरी शहरातील वाहतूक कोंडी पाहता कॉम्पक्ट गाडीची अनेक कारप्रेमी वाट पाहात होते. आता मुंबईतील इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी पीएमव्ही कंपनी (PMV Electric) 16 नोव्हेंबर 2022 ला मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या गाडीचं नाव EaS-E असं ठेवण्यात आलं आहे. पीएमव्हीची भारतातील पहिलीच गाडी आहे. इलेक्ट्रिक कारची लांबी 2915 मीमी, रुंदी 1157 मीमी आणि उंची 1600 मीमी आहे. व्हिलबेस 2087 मीमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 मीमी आहे. गाडीचं वजन 550 किलोग्राम आहे. त्यामुळे ही गाडी दाटीवाटीच्या ठिकाणी पार्क करणं सहज सोपं होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमवव्ही ईएएस-ई-मायक्रो इलेक्ट्रिक कार 10 किलोवॅट लिथियम आयरन फॉस्फेट बॅटरीवर काम करते. ही 15 किलोवॅट पीएमएसएम इलेक्ट्रिक मोटारशी जोडली जाईल. पण हे इंजिन किती टॉर्क जनरेट करते याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या गाडीचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास इतका आहे. ही गाडी तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा गाडीची रेंज 120 ते 200 किमी आहे. या गाडीची बॅटरी 3kW AC चार्जवर 4 तासात फुल चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे. 


Hybrid Car म्हणजे काय? कसं काम करते? जाणून घ्या संपूर्ण माहिती


पीएमव्ही ईएएस-ई कारमध्ये डिजिटल इन्फोटेन्मेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एअर कंडीशनिंग, रिमोट कीलेस एंट्री, रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या गाडीची बुकिंग सुरु केली आहे. या गाडीला आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी मागणी आहे.