Pornhub `त्या` महिलांना देणार 15 कोटी रुपये! आधी `तसले` Video अपलोड केले अन्...
Pornhub 15 crore Rs: जगभरामध्ये कुप्रसिद्ध असलेल्या या वेबसाईटसंदर्भातील एका प्रकरणामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मागील 3 वर्षांपासून चर्चेत असलेलं खटला निकाला निघाला आहे.
Pornhub 15 crore Rs: अडल्ट कंटेट पुरवणाऱ्या पॉर्नहब तसेच अडल्ट कंटेंट बनवणाऱ्या वेबसाईटची मातृक कंपनी असलेल्या 'आयलो'ने (Aylo) एक धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रुकलिन येथील एका न्यायालयामध्ये आयलो कंपनीने लैंगिक तस्करीमधील पीडितांसंदर्भातील कंटेंटमधून नफा कमवल्याचं मान्य केलं आहे. या कारणामुळेच कंपनीला 1.8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 18 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 14,97,14,820 इतकी म्हणजेच साधारणपणे 15 कोटी रुपये इतकी होते. आयलो कंपनीचं नाव पूर्वी माईंड ग्रीक असं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीचं नाव बदलण्यात आलं. रीब्रॅण्डींगच्या माध्यमातून कंपनीला नवीन ओळख देण्याचा मालकांचा प्रयत्न आहे.
पैसे देण्याची तयारी
'आयलो होर्टिंग्स एस. ए. आर. एल.' कंपनीने देहविक्री करण्याच्या उद्देशाने मानवी तस्करीशी संबंधित उद्योगांमधील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी आपला काही संबंध नसल्याचं आणि आपण यात दोषी नसल्याचा दावा केला होता. बळजबरीने देहविक्रीच्या व्यवहारामध्ये ढकलण्यात आलेल्या पीडित महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. नंतर हे व्हिडीओ या वेबसाईट्सवर दाखवण्यात आले. अशा पीडित महिलांना मात्र कंपनीने नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे.
कंटेंट रिव्ह्यू होणार
या पीडित महिलांबरोबर करण्यात आलेल्या करारानुसार 15 कोटी रुपयांच्या आसपासची नुकसानभरपाई कंपनी देणार आहे, असं 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या महिला असलेला कंटेटं स्क्रीनिंग प्रोटोकॉल आणि बेकायदेशीर कंटेंट रिपोर्ट प्रक्रियेच्या माध्यमातून रिव्ह्यू केला जाईल. यासाठी एक सहाय्यक या महिलांना पुरवला जाईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. या मोबदल्यात आयलो कंपनीविरोधातील सर्व आरोप 3 वर्षानंतर मागे घेतले जातील.
विशिष्ट विषयांवरील पॉर्न व्हिडीओ
'आयलो' कंपनीकडे अडल्ट कंटेंट पुरवणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट्सची मालकी आहे. या वेबसाईटवरील अनेक व्हिडीओ हे थर्ड पार्टी कंटेट शेअरिंगच्या माध्यमातून साईटवर उपलब्ध करुन दिले जातात. 2009 साली स्थापना झालेल्या 'आयलो प्रोडक्शन'च्या मालकीच्या बेवसाईट्सवर मुलींचा उल्लेख असलेल्या काही विशिष्ट विषयांवरील पॉर्न व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. या महिलांची सहमती आहे की नाही याची विचारणा न करता कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते.
बराच नफा कमवला
या अहवालानुसार 2016 ते 2019 दरम्यान, 'आयलो' कंपनीशी अनेक महिलांनी संपर्क साधून कंपनीच्या मालकीच्या वेबसाईट्ससाठी व्हिडीओ शूट करण्याच्या नावाखाली फसवणण्यात आलं. हे व्हिडीओ महिलांची ओळख पटेल अशापद्धतीने म्हणजे चेहरे दिसत असतानाही संमतीशिवाय पॉर्नहब वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर 2017 साली खटला दाखल केल्यानंतरही कंपनीच्या मालकीच्या वेबसाईट्सवर व्हिडीओ होस्ट केले जात होते. या व्हिडीओंच्या माध्यमातून 'आयलो' कंपनीने बराच पैसा नफा म्हणून कमवला.
3 वर्ष तसेच होते व्हिडीओ
2019 साली 'गर्ल्सडूपॉर्न' आणि 'गर्ल्सडूटॉइज' या 2 प्रोडक्शन कंपन्यांच्या संचालकांविरोधात कॅलिफॉर्नियामध्ये लैंगिक छळ, तस्करी आणि महिलांच्या सहमतीशिवाय त्यांचे खासगी नग्नावस्थेतील व्हिडीओ ऑनलाइन अपोस्ट करुन फसवणूक केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला. 'आयलो'ने 2020 च्या शेवटी हे व्हिडीओ आपल्या वेबसाईट्सवरुन काढून टाकले. यासंदर्भात कंपनीने एक पत्रक जारी करुन खेद व्यक्त केला होता. आता याच प्रकरणात मोठी नुकसानभरपाई कंपनी या महिलांना देणार आहे.