Porsche Cayman GT4 RS: गाड्यांबाबत खडा न खडा माहिती ठेवणाऱ्या कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महागड्या गाड्या आणि त्यातील फीचर्स चर्चेचा विषय असतो. पोर्शेच्या गाड्या अशाच यादीत येतात. त्यामुळे पोर्शे कोणती गाडी आणणार? आणि काय फीचर्स असतील याबाबत उत्सुकता असते. गेल्या वर्षी मे महिन्यात पोर्शेने 718 केमॅन जीटी 4 आरएस लाँच केली होती. या गाडीची किंमत 2.54 कोटी (एक्स शोरुम) इतकी आहे. आता पोर्शे इंडिया आपली 718 केमॅन जीटी 4 आरएस मुंबईत 25 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या 'फेस्टिवल ऑफ ड्रीम'मध्ये सादर करणार आहे. हा कार्यक्रम 26 जानेवारीपर्यंत असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे. या कार्यक्रमात सीरिजमधील इतर गाड्याही पाहता येणार आहेत. 


पोर्शे 718 केमॅन जीटी 4 आरएस गाडीची खासियत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कंपनीने 718 केमॅन मॉडेलची सुरुवात केली होती. या गाडीची किंमत 1.36 कोटी इतकी आहे. त्यानंतर यात एक एक करत मॉडेल लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे 718 केमॅन जीटी 4 आरएसचं वजन 718 जीटीएसच्या तुलनेत 35 किलोने कमी आहे. तर रेग्युलर केमॅन जीटी4 च्या तुलनेत 80 बीएचपी आणि 20 एनएम अधिक पॉवर जनरेट करते. 718 केमॅन जीटी 4 आरएसमध्ये 4 लिटर फ्लॅट सिक्स नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन आहे. या इंजिनमधून 493 बीएचपी उर्जा मिळते आणि 450 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 


बातमी वाचा- तुमच्याकडे शाओमीचा हा स्मार्टफोन तर नाही ना! मग Jio 5G च्या नावाने बोंबच


पोर्शे 718 केमॅन जीटी 4 आरएस फक्त 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी वेग धारण करते. या गाडीचा टॉप स्पीड 315 किमी प्रती तास असल्याचा कंपनीचा दावा आहे. या गाडीमध्ये 7 स्पीड ड्यूल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. पुढच्या चाकांसाठी 408 मिनी डिस्क ब्रेक, तर मागच्या चाकांना 380 मिमी डिस्क ब्रेक आहे.