नवी दिल्ली : पोर्श या कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने त्यांची शानदार 911 GT3 ही कार भारतात लॉन्च केली. जुन्या पोर्श 911 GT3 कारला अपडेट करून ही नवीन कार तयार करण्यात आलीये. यात काही टेक्निकल अ‍ॅडव्हांसमेंट केले गेले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या तुलनेत आधिक वेगवान आणि पावरफुल झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या कारची किंमत कंपनी २.३१ कोटी रूपये इतकी ठेवली आहे. कंपनीने या नव्या मॉडेलमध्ये ४ लिटार इंजिन दिलं आहे. जे ५०० पीएसची पावर आणि ४६० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. जुन्या ३.८ लिटर इंजिन मॉडलसारखीच या नव्या मॉडेलचं इंजिन ९ हजार आरपीएमची पावर जनरेट करतं. 


पोर्शने या नव्या मॉडेलमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड पीडीके ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सिस्टम ऑप्शन दिलं आहे. जुन्या मॉडेलमध्ये केवळ ऑटोमॅटीक गिअरबॉक्स होता. त्यामुळे पोर्शचे प्रशंसक नाराज होते. त्यामुळेच आता मॅन्युअलचाही पर्याय देण्यात आलाय. 


पोर्शचा दावा आहे की, नव्या 911 GT3 सुपरकारचं मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट केवळ ३.८ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता ठेवतं. तर ऑटोमॅटीक व्हेरिएंट हा वेग ३.२ सेकंदात पकडते. ही कार जास्तीत जास्त ३१८ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते.