मुंबई : लवकरच टाटा मोटर्स आपली एक कार लाँच करणार आहे. ऑटो कंपनी टाटा मोटर्स सणासुदीच्या काळात त्यांची मिनी एसयूव्ही 'पंच' लाँच करणार आहे. Tata PUNCH कंपनीच्या H2X कॉन्‍सेप्‍टवर आधारित आहे. जी कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये प्रदर्शित केली होती. या कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनच्या खाली श्रेणीमध्ये असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा 'पंच' दिवाळीच्या आसपास बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. ही एसयूव्ही इम्पॅक्ट 2.0 डिझाइन भाषेवर विकसित करण्यात आली आहे.


ALFA आर्किटेक्‍चरवर टाटाची पहिली SUV


PUNCH टाटा मोटर्सची पहिली एसयूव्ही असेल. जी अल्फा आर्किटेक्चर (Agile Light Flexible Advanced Architecture) वर विकसित केली गेली आहे. टाटा मोटर्सचे म्हणणं आहे की, या फेस्टिव सीजनमध्ये त्याचं नॅशनल लॉन्‍च होणार आहे. 'पंच' स्‍पोट्र्स डायनेमिक्‍ससह एक टफ यूटिलिटी आहे. मात्र, कंपनीने याबाबत फारशी माहिती जाहीर केलेली नाही.


PUNCH: SUV फॅमिलीचं चौथं एडिशन 


शैलेश चंद्रा, अध्यक्ष (पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिट) टाटा मोटर्स म्हणतात, “टाटा पंच हे एक एनर्जेटिक वाहन आहे. याद्वारे कोणीही कुठेही प्रवास करू शकतो.”ते पुढे म्हणाले की, पंच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. हे कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही वैशिष्ट्यं शोधत असलेल्या ग्राहकांसाठी विकसित करण्यात आलं आहे. टाटा मोटर्सच्या एसयूव्ही कुटुंबात पंच चौथं एडिशन आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदा ऑटो एक्सपो २०२० मध्ये HBX संकल्पना मायक्रो-एसयूव्हीच्या रूपात शोकेस केलं आहे.