मुंबई : कार्बन डायऑक्साईडमुळे (Carbon Dioxide) होणारे प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची (Electric Bus) मागणी सध्या सर्वत्र वाढते आहे. पुण्यात जवळ जवळ 400 हून अधिक 'इ बसेस' (E Bus) रस्त्यावर धावत आहेत. मुंबईत देखील 2017 पासून साध्या आणि वातानुकूलीत बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. बेस्ट बसेसच्या ताफ्यातील इ बसेसची संख्या देखील 400 हून अधिक आहे. शिवाय डबल डेकर बसेस (Double Decker Bus) देखील प्रतिक्षेत आहेत. नविमुंबईत देखील इलेक्ट्रिक बसेस वाहतूक सेवेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या महानगरासोबत ठाण्यात देखील इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत. पहिल्या टप्यात 12 मीटरच्या मोठ्या तसेच 9 मीटरच्या मीडी अशा दोन प्रकारच्या बसेसची मागणी टीमटीने (TMT) ऑलेक्ट्रा ग्रिनटेककडे (Olectra Greentech) नोंदवली आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेक आणि इवे ट्रान्स या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यामार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत.  एकूण 123 इलेक्ट्रिक बसेसचे मागणीपत्र देण्यात आले आहे.  यातील काही बसेस वातानूकुलित तर काही साध्या अशा प्रकारात आहेत. अतिशय प्रगत सुविधांनी या बसेस सज्ज असणार आहेत .  


काय आहेत बसेस मध्ये सुविधा 
प्रवाशांच्या सुखसोयीसाठी 12 मीटर आणि 9 मीटर लांबीच्या या बसेसमध्ये उत्तम एअर सस्पेंशन आहे. तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे,  आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत. 9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल.  हा करार 15 वर्षासाठी करण्यात येणार आहे. या निविदेची अंदाजे किंमत 185 कोटी रुपये एवढी असेल. यात  12 मीटरच्या एकूण 55 बसेस आहेत यात 45 एसी तर 10 विनावातानुकूलित आहेत.  9 मीटरच्या एकूण 68 बसेस आहेत यात 26 एसी तर 42 नॉनएसी प्रकारच्या बसेस या करारानूसार टीमटीला मिळणार आहेत.