RBI Guideline UPI wrong transfer: आजकाल  स्मार्टफोन व इंटरनेटमुळे ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या (smartphone) एका क्लिकवर कोणालाही अगदी एका सेकंदात पैसे पाठवणे शक्य आहे. तुम्ही अगदी घरबसल्या कोणाच्याही बँक (bank account) खात्यात पैसे पाठवू शकता. ऑनलाइन पेमेंटमुळे (online payment) वेळेची तर बचत होतेच, मात्र पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया देखील खूपच सोपी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पैसे पाठवताना बँक अकाउंट नंबर, IFSC कोड इत्यादी चुकल्यास पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात व मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी चुकून गेलेली रक्कम परत देखील मिळवू शकता. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया. 


RBI ने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली (RBI Guideline Wrong upi Payment Transfer)


RBI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमचे पैसे 48 तासांच्या आत परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. जर बँकेने पैसे परत मिळण्यास मदत केली नाही, तर ग्राहक bankingombudsman.rbi.org.in वर तक्रार करू शकतात. चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले तर त्यासाठी तक्रार पत्र लिहून बँकेला द्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, पैसे गेलेले खाते क्रमांक लिहावे लागतील.


अशा प्रकारे बँकेकडून परतावा मिळवू शकता (Bank Refund UPI)


चुकून पैसे चुकीच्या खात्यात गेल्यास तुमच्या बँकेला कॉल (banking call) करा आणि सर्व माहितीसह PPBL क्रमांक प्रविष्ट करा. तुम्ही पेमेंट करता तेव्हा हा नंबर तुमच्या मोबाईलवर येतो. यानंतर तुम्ही बँकेत जाऊन तक्रार करू शकता. तेथे तुम्हाला शाखा व्यवस्थापकाला तक्रार पत्र लिहावे लागेल. या पत्रात पैसे कोणत्या खाते क्रमांकावर गेले ते लिहा. बँकेत जाण्यापूर्वी या सर्व गोष्टी सोबत ठेवा कारण या सर्व गोष्टी तक्रारीत उपयोगी पडतील. Transaction reference number, date of transaction, amount, IFSC code


वाचा : Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं


तात्काळ गुन्हा नोंदवा


तुमचे पैसे परत मिळवण्याचा एक कायदेशीर मार्ग देखील आहे. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले असतील, त्याने ते परत करण्यास नकार दिला, तर त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो. तथापि, पैसे परत न केल्यास, हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन मानला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लाभार्थीच्या खात्याबद्दल योग्य माहिती देणे लिंकरची जबाबदारी आहे. जर, कोणत्याही कारणास्तव, लिंकरने चूक केली, तर बँकेला त्यासाठी जबाबदार मानले जात नाही.