Realme 10 Pro Series Launched in India: रियलमीनं भारतात Realme 10 प्रो सीरिज अखेर लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमींना या मोबाईलबाबत उत्सुकता होती. कंपनीने या सीरिजचे दोन मॉडेल सादर केले आहेत. यापूर्वी हे मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले, 108 एमपी कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी आहे. रियलमी 10 प्रो दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. यात 6GB + 128GB आणि 8GB + 128GB असे प्रकार आहेत. या मॉडेलची किंमत अनुक्रमे 18,999 आणि 19,999 रुपये आहे. दुसरीकडे Realme 10 Pro Plus चे तीन प्रकार लाँच केले आहेत. यात 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB उपलब्ध असतील. या मॉडेलची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 25,999 रुपये आणि 27,999 रुपये असेल. या मोबाईलचा सेल 14 डिसेंबरपासून, तर रियलमी प्रोचा सेल 16 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर असणार आहे. त्याचबरोबर अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन मार्केटमध्येही फोन मिळेल. 


Realme 10 Pro Specifications


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियलमी 10 प्रोमध्ये 6.7-इंचाचा फुल HD + LCD डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनचा रिफ्रेश दर 120HZ आणि 680 nits चा पीक ब्राइटनेस आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे समर्थित आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून 108MP वाइड लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. समोरच्या बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल स्पीकर आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे.



बातमी वाचा- Jio चा सर्वात स्वस्त 5G Smartphone, बॅटरी आणि कॅमेऱ्याबाबत जाणून घ्या सर्व काही


Realme 10 Pro Plus Specifications


रियलमी 10 प्रो प्लसमध्ये FHD + रिझोल्यूशनसह 6.7-इंच वक्र OLED डिस्प्ले आहे. याशिवाय, 120HZ चा रिफ्रेश दर मिळेल. स्क्रीन 800 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोन MediaTek Dimensity 1080 चिपद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 108MP + 8MP (अल्ट्रा वाइड) + 2MP (मॅक्रो) कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय समोर 16MP सेल्फी शूटर आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.