Xiamo Smartphone Launched: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiamo ने भारतात नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने Redmi 12C आणि Redmi Note 12 हे दोन सर्वसामान्यांना परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 4G आहेत. कंपनीने याआधीच Redmi Note 12 5G व्हेरियंट लाँच केलं आहे. आता कंपनीने याचं 4G व्हेरियंट लाँच केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Redmi 12C च्या बेस मॉडेलची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. याची किंमत 8999 रुपये इतकी आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आला आहे. तसंच दुसऱ्या मॉडेलमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. याची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. 


Redmi Note 12 4G ची किंमत 14 हजार 999 रुपयांपासून सुरु होते. याच्या बेस व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 64GB चा स्टोरेज देण्यात आला आहे. दरम्यान, 6GB आणि 128 GB व्हेरियंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. 


Redmi 12C मध्ये 6.71 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच 60Hz चा स्टँटर्ड रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये, MediaTek HelioG85 चिपसेट देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. दरम्यान, यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय यात मायक्रो युसएसबी सपोर्ट आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असून, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


Redmi Note 12 बद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये 6.67 इंचाचा SuperAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पूर्णपणे एचडी प्लस पॅनेल आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 685 चिपसेट आहे. 


याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आला आहे. एक कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासह 33W चार्जर देण्यात आला आहे.