Redmi Note 13 Pro: Redmi च्या एका स्मार्टफोन सीरीज लाँच होताच एकाच दिवसांत सर्वाधीक विक्री झाली आहे. Redmi Note 13 Pro सीरीज मागच्याच आठवड्यात लाँच करण्यात आली आहे. आज सकाळीच या सीरीजचा पहिला सेल पार पडला. सेल सुरू होताच हा फोन सुपरहिट ठरला आहे. एका तासांच्या आतच फोनचे 410,000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचे CEO लेई जून यांनी ट्वीट करुन  Redmi च्या टीमचे कौतुक केले आहे. Redmi Note 13 Pro ची किंमत आणि फिचर्स याबाबत जाणून घेऊया. 


Redmi Note 13 Pro Series Pricing


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Redmi Note 13 Pro सीरीजमध्ये तीन मॉडेल बाजारात उतरवले आहेत. नोट 13, नोट 13 प्रो आणि नोट 13 प्रो+। या तिन्ही स्मार्टफोनची किंमत पुढीलप्रमाणे आहे. 1099 युआन, 1399 युआन आणि 1899 युआन है, रेडमी नोट 13 सीरीजच्या सर्व स्मार्टफोनवर सुरुवातीच्या सेलवर 100 युआनची सूट देण्यात आली होती. 


Redmi Note 13 Pro Price


8GB + 128GB: 1,499 yuan (17,070 रुपये)
8GB + 256GB: 1,599 yuan (18,152 रुपये)
12GB + 256GB: 1,799 yuan (20,484 रुपये)
12GB + 512GB: 1,999 yuan (22,732 रुपये)
16GB + 512GB: 2,099 yuan (23,898 रुपये)


Redmi Note 13 Pro+ Price


12GB + 256GB: 1,999 yuan (22,732 रुपये)
12GB + 512GB: 2,199 yuan (24,980 रुपये)
16GB + 512GB: 2,299 yuan (26,146 रुपये)


Redmi Note 13 Pro Series Specs


रेडमी नोट 13 प्रो आणि प्रो+ या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 1800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120 Hz रिफ्रेश रेट आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये MIUI 14 सह Android 13 देण्यात आले आहे. रेडमी नोटच्या प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला असून हे मॉडेल 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. तर, Pro+ मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 7200-Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. 


Redmi Note 13 Pro आणि Pro+ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 200 MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. Pro+ स्मार्टफोन पाणी आणि धूळ प्रतिरोध (IP68) आहे. म्हणजे पाणी आणि धुळीपासून फोनचा बचाव होतो. जेव्हा तुम्हाला खराब हवामानात किंवा बाहेर वापरायचा झाल्यास हे फिचर तुम्हाला सेफ्टी देऊ शकते. 


Redmi Note 13 Pro Series Battery


प्रो मॉडेलमध्ये 67W जलद चार्जिंगसह 5100mAh बॅटरी आहे. यामुळं फोन फास्ट चार्ज होतो. Pro+ मध्ये 120W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे, जी प्रो मॉडेलपेक्षा थोडी लहान आहे, परंतु तरीदेखील ही बॅटरी दीर्घकाळ टिकते.