मुंबई : काही दिवसांपूर्वी शिओमीच्या फोनने ऑनलाईन सेलिंगमध्ये तुफान विक्री केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांमध्ये रेडमी नोट ४ या फोनला खूपच प्रसिद्धी आहे. आता या फोनच्या किंमतीमध्ये अजून घट  करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या बाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 



 


3 जीबी + ३२ जीबी व्हेरिएन्टचा रेडमी नोट ४ या फोनची किंमत १०९९९ रूपये आहे. आता यामध्ये १००० रूपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन ९९९९ रूपयांमध्ये मिळणार आहे. 


४ जीबी +  ६४ जीबीचा व्हेरिएंट  आता १२९९९ रूपयांऐवजी ११९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.  


रेडमी नोट 4 हा 4जी ड्युएल सीमला सपोर्ट करणारा आहे. या फोनमधील प्रायमरी सीम 4G+/ 4G / 3G / 2G  कॉल्स आणि डाटाला मदत करतो. तर दुसरे सीम हे केवळ 3G कॉल्सला सपोर्ट करणार आहे. 


रेडमी मध्ये इन्फ्रा रेड रिमोट फंक्शन असल्याने अनेक टीव्ही, सेट टॉप बॉक्स , एअर कंडीशन्स, स्पीकरला सपोर्ट करतात. आयआर सेन्सर आणि मी रिमोट अ‍ॅप अनेक घरातील अप्लायंसला सपोर्ट करतात.