Reliance DTH चा धमाका, ५ वर्षांपर्यंत पाहा सर्व चॅनल्स Free
`या` तारखेपासून बुकिंग सुरु...
मुंबई : र्रिलायन्स बिग टीव्हीने एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे. कंपनीने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलेला प्लान ऐकल्यावर तुम्हालाही आनंद होईल. कारण, कंपनीने एका वर्षासाठी सर्व चॅनल्स फ्री (मोफत) दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने डिजिटल इंडिया अंतर्गत पार्टनरशिप करताना डायरेक्ट टू होम सर्व्हिसनुसार जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. रिलायन्सने यासाठी देशभरात ५० हजार पोस्ट ऑफिस सोबतच पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे ग्राहक सुरुवाती बुकिंग पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करु शकणार आहेत.
५ वर्षांपर्यंत चॅनल्स फ्री
या प्लानमध्ये कंपनी ५०० फ्री-टू-एअर चॅनल्स ५ वर्षांसाठी ग्राहकांना अगदी मोफत दाखवणार आहे. तर, पेड चॅनल्स तुम्ही एका वर्षापर्यंत फ्री पाहू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला रिलायन्स बिग टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सची प्री बुकिंग करावी लागणार आहे. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एचडी HEVC सेट-टॉप बॉक्स देण्यात येणार आहे. या सेट-टॉप बॉक्स अंतर्गत ग्राहकांना रेकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, रेकॉर्डिंग अँड व्यूइंग सारखे लेटेस्ट फिचर्स असणार आहेत. १ वर्षापर्यंत चॅनल्स फ्री असणार आहे आणि यामध्ये एचडी चॅनल्सचाही समावेश आहे.
२० जून पासून बुकिंग सुरु
कंपनीने या सर्व्हिससाठी प्री-बुकिंग २० जून पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि सिक्किम मधील युजर्स डीटीएचची प्री-बुकिंग करु शकणार आहेत.
४९९ रुपयांत कनेक्शन
ग्राहक ४९९ रुपये जमा करुन पोस्ट ऑफिसमधून ही ऑफर मिळवू शकतात. तर, सेट-टॉप बॉक्स इंस्टॉलेशन दरम्यान १५०० रुपये द्यावे लागणार आहेत. लॉयल्टी बोनससाठी ग्राहकांना दुसऱ्या वर्षीपासून ३०० रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. असं दोन वर्षांपर्यंत कराव लागणार आहे. त्यानंतर सब्सक्रायबर्सला २ हजार रुपयांची लॉयल्टी बोनस मिळेल. म्हणजेच तुम्ही सुरुवातीला जमा केलेली रक्कम तुम्हाला पुन्हा मिळेल.
या ठिकाणी करा बुकिंग
रिलायन्स बिग टीव्हीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सेट-टॉप बॉक्ससाठी प्री-बुकिंग करु शकता. या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना ४९९ रुपये भरावे लागणार आहेत. तर, आऊटडोअर यूनिटसाठी १५०० रुपये द्यावे लागणार आहेत.
डिजिटल क्रांती
कंपनीचे संचालक विजेंद्र सिंह यांनी या नव्या प्लानची घोषणा करताना म्हटलं की, या प्लानच्या माध्यमातून भारतातील मनोरंजनाची व्याख्या स्पष्ट होणार आहे. रिलायन्स बिग टीव्ही मोफत एक एचडी एचईवीसी HD HEVC सेट टॉप बॉक्सने मनोरंजन विश्वात डिजिटल क्रांती आणण्यासाठी तयार आहे.