नवी दिल्ली : जिओचे लॉन्च करून रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाका केला. आता रिलायन्स जिओ इंटरनेटच्या दुनियेत धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता जिओ आपल्या लो कॉस्ट ब्रॉड ब्रॅंड नेटवर्क जिओ फायबर (Jio Fiber) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जिओच्या या सेवेचा देशातील कोट्यावधी लोकांना फायदा मिेळेल. तसंच यामुळे ब्रॉडब्रॅँड सेक्टरच्या कंपन्यांना जबरदस्त टक्कर मिळेल.


हायस्पीड ब्रॉडब्रॅंड सेवा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी़डिया रिपोटर्सनुसार रिलायन्स जिओ फायबरच्या तर्फे अत्यंत स्वस्त दरात 1Gbpsची हायस्पीड ब्रॉडब्रॅंड सेवा सादर करण्यात येईल. एका टेक वेबसाईटच्या वृत्तानुसार, जिओ फायबर मार्चच्या शेवटापर्यंत लॉन्च होईल. मात्र यावर कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायन्स जिओने टेलीकॉम सर्विस सुरु केली. त्यानंतर टेलिकॉम विश्वास धमाका झाला. त्यानंतर स्वस्त डेटा, व्हाईस कॉलची सुविधा सुरू केली.


कमी किंमतीत हायस्पीड इंटरनेट


टेक वेबसाईटच्या प्रकाशित वृत्तानंतर ही सर्व्हिस सध्या सुरत, मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, दिल्ली एनसीआर, हैद्राबाद आणि जामनगर १० मोठ्या शहारात मिळेल. याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्याचा अधिक विस्तार करण्यात येईल. वर्षअखेरीस पर्यंत कंपनी जिओ फायबरची सुविधा ३० शहरात सुरु करतील.


ही असेल प्रमोशनल ऑफर


जिओ ऑफिशियल वेबसाईटवरून लीक झालेल्या माहितीनुसार, जिओ प्रत्येक महिन्याला 100 Mbps स्पीड वाले 100 GB डेटा तीन महिन्यांपर्यंत मिळू शकतो. ही कंपनीची प्रमोशनल ऑफर असेल. याशिवाय जिओच्या राऊटरसाठी ४००० रुपयांपर्यंत ग्राहकांकडून घेतली जाईल. ही रक्कम रिफंडेबल असेल. 100 GB डेटाची मर्यादा संपल्यानंतर याचा स्पीड 1 Mbps इतका असेल. दुसऱ्या एका रिपोट्नुसार, ५०० रुपयात तीन महिन्यांसाठी 100 GB डेटा मिळेल. जिओ DTH सर्व्हिस आणण्याच्या तयारीत आहे.