नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. काही दिवसांपूर्वीच १४९ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटाचा प्लॅन लॉन्च केल्यानंतर आता जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३९९ रूपयांच्या रिचार्ज केल्यावर १०० टक्के कॅशबॅक मिळेल. जिओची ही ऑफर दिवाळी धन धना धन ऑफर आहे. रिलायन्स जिओची ही ऑफर १२ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आणि १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल. 


ग्राहकांना कंपनीकडून दिला जात असलेला कॅशबॅक व्हाऊचरच्या रूपात मिळेल. हे तुम्ही रिचार्ज करतेवेळी वापरू शकता. गॅजेट्स ३६० मध्ये प्रकाशित झालेल्या वॄत्तानुसार, या कालावधीत रिचार्ज करणा-या ग्राहकाला ५० रूपयांचे ८ व्हाऊचर मिळेल. या व्हाऊचरचा फायदा ग्राहक भविष्यात घेऊ शकतात. 


यासाठी अट ही आहे की, एकदा केवळ एकाच व्हाऊचरचा प्रयोग केला जाऊ शकतो. व्हाऊचर वापर तुम्ही १५ नोव्हेंबरनंतरच करू शकाल. म्हणजे भविष्यात तुम्ही जेव्हाही ३०९ रूपयांचं रिचार्ज तेव्हा तुम्हाला ५० रूपयांच्या व्हाऊचरसोबत २५९ रूपये द्यावे लागतील. ही ऑफर जिओ अ‍ॅप, जिओ वेबसाईट, जिओ स्टोर्स, रिलायन्स डिजिटल स्टोरमधून घेऊ शकता.


दरम्यान, टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. बुधवारी एअरटेलने सुद्धा १३९९ रूपयांमध्ये ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा मोबाईल कंपनी २८९९ रूपयांमध्ये कार्बन मोबाईलसोबत देत आहे. ज्यात तुम्हाला निश्चित १५०० रूपये कॅशबॅक मिळतात.