नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीत आपल्या विविध प्लान्स आणि ऑफर्सने धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. रिलायन्स जिओने आता म्युझिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी पूढाकार घेतला आहे.


नवा धमाका करण्यासाठी जिओ सज्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने प्रसिद्ध म्युझिक अॅप सावनसोबत एक करार केला आहे. या करारानंतर आता जिओ-सावन या नावाने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धमाल करण्यासाठी जिओ सज्ज झाली आहे. याची घोषणा स्वत: आकाश अंबानी याने केली आहे. आकाश अंबानी याच्या मते, ऑनलाईन म्युझिकच्या जगातही जिओ म्युझिक आपला झेंडा फडकवण्यास सज्ज आहे.


१ बिलियन डॉलरची कंपनी


मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची डिजिटल म्युझिक सर्व्हिस 'जिओ म्युझिक' आणि जगातील मोठं म्युझिक अॅप 'सावन' यांच्यात एक करार झाला आहे. दोघांना एकत्रित करत याचं बाजार मुल्य १ बिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक होणार आहे.


कॅश आणि शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक


जिओ म्युझिकचं मार्केट वॅल्यू ६७० मिलियन अमेरिकन डॉलर आहे. विलयासोबतच रिलायन्स यामध्ये १०४ मिलियन डॉलर कॅशची गुंतवणूक करणार आहे. तसेच इतर भागेदारी शेअर्सच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये आधी २० मिलियन डॉलरची गुंतवणूक असणार आहे.


आकाश अंबानीने केली घोषणा


रिलायन्स जिओ आणि सावन यांच्यात झालेल्या कराराची घोषणा स्वत: आकाश अंबानीने केली आहे. आकाश अंबानीने सांगितले की, डिजिटल इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना नॉन स्टॉप डिजिटल इंटरटेन्मेंट सर्व्हिस देणं हा या मागचा उद्देश आहे.


यांची भागेदारी खरेदी करणार जिओ


रिलायन्स जिओ, सावनच्या सध्याचे शेअरधारकांची काही भागेदारी खरेदी करणार आहे. यामध्ये टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, लिबर्टी मीडिया आणि बर्टल्समॅन यांचा समावेश आहे. सावनचे सह-संस्थापक ऋषी मल्होत्रा, परमदीप सिंह, विनोद भट यांच्या नेत्रृत्वात पुढील काम सुरु राहणार आहे.


मीडिया प्लॅटफॉर्म बनवण्याची तयारी 


सावनचे को-फाऊंडर ऋषी मल्होत्रा यांच्या मते, जवळपास दहा वर्षांपूर्वी आम्ही विचार केला होता की असं काही म्युझिकल प्लॅटफॉर्म तयार करायचं जे दक्षिण आशियातील देशांच्या संस्कृतीशी संबंधित असेल. रिलायन्ससोबत करण्यात आलेल्या भागेदारीने आम्ही जगभरात वेगाने वाढणारं मीडिया प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे.