लंडन : दूरसंचार रिलायन्स जिओ २०१८ मध्ये एक नवीन अॅप सादर करणार आहे. हा व्हर्चुअल रियालिटी अॅप बनवण्यासाठी कंपनी लंडनच्या बरमिंघम सिटी विश्वविद्यालयच्या तज्ज्ञांशी हातमिळवणी करण्याची आशा आहे, अशी माहिती विश्वविद्यालयाने दिली. भविष्यातील भागीदारीसाठी आणि तेथील विद्यार्थ्यांना कसे प्रशिक्षण दिले जाते, हे पाहण्यासाठी जियो स्टूडियोजचे प्रमुख आदित्य भट्ट आणि क्रिएटिव डिरेक्टर अंकित शर्मा यांनी विश्वविद्यालयाचा दौरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलमसीजीआयचे संस्थापक आणि प्रबंध डिरेक्टर आनंद भानुशाली यांनी देखील ब्रिटनच्या आंतराष्ट्रीय व्यापार विभागातर्फे आयोजित केलेल्या दौऱ्यात सहभाग घेतला. त्यांनी विश्वविद्यालयाच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. फिलमसीजीआयचा अॅनिमेशन स्टूडियो  असून त्याचे ऑफिस मुंबई व पुण्यात आहे. या कंपनीत ९० कलाकार काम करतात. जे चित्रपट किंवा मालिकांमध्ये फोटो एडिटिंग किंवा व्हर्चुअल इफेक्ट्स देण्याचे काम करतात. 


त्याचबरोबर ही कंपनी युरोप आणि आशियाच्या मोठ्या स्टुडियोजला देखील आपल्या सेवा पुरवतात. तसेच वीआर आणि एआर क्षेत्रात देखील ही कंपनी सेवा पुरवते.