मुंबई : तुम्हीही रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्स आहात आणि नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिलायन्स जिओतर्फे एक जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. पाहूयात काय आहे ही रिलायन्स जिओची नवी ऑफर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओतर्फे सॅमसंग गॅलेक्सी जे2 2018 (Samsung Galaxy J2 2018) आणि सॅमसंग गॅलेक्सी जे7 ड्युओ (Samsung Galaxy J7 Duo) खरेदीवर जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. या दोन स्मार्टफोन्सपैकी तुम्ही कुठलाही एक स्मार्टफोन खरेदी कराल तर तुम्हाला जिओ कडून 2750 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. यासोबतच 100 GB 4G डेटा ही देण्यात येत आहे. 


रिलायन्स जिओ तर्फे मिळणारा कॅशबॅक तुमच्या 'MyJio Account' मध्ये क्रेडिट केला जाईल. यासाठी तुम्हाला 198 किंवा 299 रुपयांचा टेरिफ प्लानने रिचार्ज करावं लागणार आहे. या ऑफरचा लाभ केवळ रिलायन्स जिओचे युजर्स नवा सॅमसंग गॅलेक्सी जे2 2018 किंवा सॅमसंग गॅलेक्सी जे7 ड्युओ खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे.


सॅमसंग गॅलेक्सी जे2 2018 आणि सॅमसंग गॅलेक्सी जे7 ड्युओ हे दोन्ही फोन्स भारतीय बाजारात एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही फोन्समध्ये सॅमसंग मॉल इनबिल्ड आहे. गॅलेक्सी जे2 2018  या फोनची किंमत 8190 रुपये आहे तर गॅलेक्सी जे7 ड्युओची किंमत 16,990 रुपये आहे.


Samsung Galaxy J2 2018 वर ऑफर 


- जिओतर्फे 2,750 रुपयांचा कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 वाऊचरमधून मिळणार


- 100 GB 4G डेटाचा लाभ 10-10 GB च्या डेटा वाऊचरमधून मिळणार 


- ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार 


- ही ऑफर केवळ 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार 


Samsung Galaxy J7 Duo वर ऑफर


- 2,750 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 वाऊचरमधून मिळणार 


- ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार 


- कॅशबॅकसाठी 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करावं लागणार


- डबल इंटरनेट डेटासाठी 198 किंवा त्याहून अधिकचं रिचार्ज करावं लागणार