नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे. ग्लोबल फिचर फोन मार्केटमध्ये १५ टक्के भागेदारीसोबत जिओ फोनची सर्वाधिक भागेदारी आहे. बाजारातील भागेदारीत जिओ फोन नंतर नोकिया एचएमडी, आयटेल, सॅमसंग आणि टेक्नो या फोनचा क्रमांक लागतो.


फिचर फोन बाजारात ३८ टक्क्यांनी वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काऊंटर पॉईंट तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, रिलायन्स जिओ फोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. ही वाढ २०१८ मधील पहिल्या तिमाहीत फिचर फोनच्या बाजारात ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोकिया एचएमडीची बाजारात १४ टक्के भागेदारी आहे. तर, आयटेलची १३ टक्के भागेदारी आहे. त्यानंतर सॅमसंग आणि टेक्नोची ६ टक्के भागेदारी आहे.


प्रत्येक वर्षाला ५० लाख फिचर फोनची विक्री


मार्केट रिसर्च फर्मतर्फे सांगण्यात आलं आहे की, अद्यापही जगभरात प्रत्येक वर्षी ५० लाख फिचर फोनची विक्री होते. आकड्यांनुसार, जगभरात दोन बिलियन (२ कोटी) फिचर फोन युजर्स आहेत. अद्यापही फिचर फोनचं मार्केट खूप मोठं आहे. अनेक युजर्स स्मार्टफोन ऐवजी फिचर फोन खरेदी करणं पसंद करतात. २०१८ मध्ये जगभरात झालेल्या फिचर फोनच्या विक्रीपैकी ४३ टक्के विक्री ही भारतात झाली आहे.


रिसर्च फर्मने हे सुद्धा सांगितलं आहे की, काही फिचर फोन युजर डिजिटल, इकोनॉमिक आणि अशिक्षिततेमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे ते महागडे स्मार्टफोन आणि त्याचा इंटरनेट डेटा वापरु शकत नाहीत. म्हणूनच फिचर फोनची बाजारात खूपच मागणी आहे.