मुंबई  : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे. यात सध्याच्या १ जीबी डाटा ऐवजी दिवसाला १.५ जीबी डाटा मिळणार आहे. तर ज्यांच्याकडे दिवसाला १.५ जीबी डाटा असेल तर त्यांना २ जीबी डाटा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी ग्राहकांना कोणतेही एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागणार नाही. तसेच या प्लानची मुदतही कायम राहणार आहे. याला जिओ हॅपी न्यू इअर प्लान अंतर्गत अधिक डाटा प्रजासत्ताक दिनाचा जोडला आहे. 


रिलायन्स जिओने एअरटेलच्या डाटा प्लानला टक्कर देण्यासाठी ही नवीन योजना आणली आहे. एअरटेलने आपला १ जीबी डेटा प्लान हा १.४ जीबी केला होता.  रिलायन्सचा हा नवीन डाटा प्लान २६ जानेवारी २०१८ पासून लागू होणार ाहे. 


यात रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्तातील प्लान ९८ रुपयांचा आहे. त्याला २ जीबी डेटा २८ दिवसांसाठी वापरता येणार आहे. यापूर्वी हा प्लान १४ दिवस व्हॅलिडीटीसह होता. त्याल २.१ जीबी डाटा मिळत होता. आता त्यात अधिकचे १४ दिवस मुदत वाढविण्यात आली आहे. यात जिओ युजर्स फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉल, एसएमएस आणि जिओ सूट अॅप वापरू शकणार आहेत. 


पाहा कसे आहेत हे प्लान...