मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशातील इन्वेस्टर्स समिटमध्ये बेरोजगार तरूणांसाठी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. उत्तरप्रदेशामध्ये अंबानी 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मात्र यासोबतच येथील लाखभर तरूणांना नोकरीची संधी खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


3 वर्षात लाखभर नोकर्‍या देणार  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबांनींनी येत्या 3 वर्षांमध्ये सुमारे लाखभर तरूणांना नोकर्‍या देणार असल्याची घोषणा केली आहे. 


डिजिटल इंडियासोबत नोकरीची संधी 


उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवण्यासाठी डिजिटल इंडिया या प्रकल्पाला चालना देणं गरजेचे आहे. याकरिता रिलायंसने देशभरात जागतिक स्तरातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवले आहे. यापूर्वी रिलायंसने सुमारे 40000 वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोकर्‍या उपलाब्ध केल्या आहेत. 


डिसेंबर 2018 मध्ये गावागावात पोहचणार जियो  


मुकेश अंबानींनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर प्रदेशामध्ये 2 कोटीहून अधिक फोन उपलब्ध केले जातील. येथे 2 कोटी लोकांना स्वस्त दरामध्ये हाय स्पीड डाटा दिला जाणार आहे. डिसेंबर 2018 पर्यंत जिओ उत्तर प्रदेशामध्ये गावागावात पोहचवला जाईल असा रिलायंस कंपनीचा मानस आहे.