नवी दिल्‍ली : ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे रिलायन्स जिओनेही फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली आहे. या फेस्टिव्हल सीझनमध्ये रिलायन्स जिओने त्यांच्या Jiofi डोंगलची किंमत १९९९ रूपयांहून केवळ ९९९ रूपये केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणजे तुम्हाला Jiofi डोंगलवर चक्क १ हजार रूपयांची सूट मिळत आहे. Jiofi वर ही ऑफर त्याच ग्राहकांना मिळणार जे २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान Jiofi डोंगल खरेदी करतील.


याआधीही रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jiofi वर ऑफर दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओ व्हर्चुअली Jiofi डोंगल मोफत देण्याची ऑफर देत होते. या ऑफरनुसार यूजर्सला १९९९ रूपये पे केल्यावर डोंगलच्या किंमती इतकाच मोफत डेटा देत होते. तर वॉईसची सुविधा १२ महिन्यांसाठी दिली जात होती.  


आता नव्या ९९९ रूपयांच्या ऑफरनुसार Jiofi खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स, २जीबी ४जी डेटा प्रति दिवस, १०० एमएमएस प्रति दिवस किंवा ६ रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स, १जीबी ४जी डेटा प्रति दिवस, १०० एसएमएस प्रति दिवस देणार आहेत.