नवी दिल्ली : जिओ युजर्सला कंपनीने मोठे गिफ्ट दिले आहे. युजर्ससाठी प्लॅनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कंपनीने १५३ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन अपडेट केला आहे. आता १५३ रुपयांच्या पॅकमध्ये युजर्संना रोज 1Gb हायस्पीड 4जी डेटा मिळेल. रिलान्यस जिओ १५३ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स  (लोकल, एसटीडी, रोमिंग), दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्रि सब्सिक्रिप्शन देखील मिळेल. या रिचार्जची व्हॅलिडिटी २८ दिवसांसाठी असेल.


पूर्वी मिळत होता कमी डेटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी जिओ फोन लॉन्च झाला होता. तेव्हा युजर्सला १५३ रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 500 MB हायस्पीड 4G डेटा मिळत होता. याशिवाय बाकी सुविधा मिळत होत्या. मात्र जियो युजर्ससाठी कंपनीने हा प्लॅन अपडेट केला. म्हणजेच युजर्संना अधिक फायदा मिळेल.


लवकरच येतील दोन नवीन पॅक


जिओ फोन युजर्ससाठी लवकरच दोन छोटे पॅकही लॉन्च होतील. या प्लॅनची किंमत २४ रुपये आणि ५४ रूपये आहे. २४ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना फ्री कॉलिंग, रोज 500 एमबी 4G डेटा, २० एसएमएस मिळतील. प्लॅनची व्हॅलिडिटी दोन दिवसांची आहे.


५४ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळेल


याच्या व्यतिरिक्त एक छोटा पॅकही युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. ५४ रुपयांच्या पॅकमध्ये पूर्वीप्रमाणेच इतर सुविधा मिळतील. फक्त एसएमएसची संख्या ७० होईल. जिओ फोन युजर्ससाठी ५४ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ७ दिवस असेल.