मुंबई : स्वस्त प्लॅन्सने टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका करणाऱ्या रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी बंपर फायदा देण्यासाठी एक प्लॅन अपडेट केला आहे. दररोज अधिक इंटरनेट डेटा आवश्यक असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अलिकडेच एअरटेल आणि बीएसएनएलने आपले प्लॅन्स अपडेट केले आहेत. त्यानंतर आता जिओनेही आपले प्लॅन्स अपडेट केले आहेत. गेल्या काही दिवसात रिलायन्स जिओ आपल्या प्रत्येक प्लॅनमध्ये रोज 1.5 GB अधिक डेटा देत आहे. 


हा आहे नवा प्लॅन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रियालन्स जिओकडून ७९९ रुपयांचा प्लॅनचे अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे. अपडेटेड प्लॅन्सनुसार युजर्सला ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 6.5 GB डेटा देण्यात येईल. याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. हा ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास ३० जून २०१८ पूर्वी रिजार्च करावा लागेल.


या प्लॅनच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये जिओकडून रेगुलर प्लॅनशिवाय 1.5 GB एक्सट्रा हायस्पीड 4G इंटरनेट डेटा दिला जाता आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये २८ दिवसात कंपनीकडून 140 GB डेटा दिला जात होता. मात्र आता हा वाढून 182 GB करण्यात आला आहे. पूर्वी यात रोज 5 GB डेटा दिला जात होता. 


त्याशिवाय मिळणार या सुविधा


याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सला फ्री अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करण्याची सुविधा मिळत आहे. त्याचबरोबर दिवसाला १०० एसएमएस ची सुविधा देण्यात येत आहे. अलिकडेच जिओने आपल्या 299 रुपयांचा प्लॅनही अपडेट केला. यात दररोज 1.5 GB एक्सट्रा डेटा दिला जात आहे. यात सुरुवातीला मिळणारा 84 GB डेटा वाढवून 128 GB करण्यात आला आहे.


कंपनीच्या या स्किममध्ये युजर्संना 149, 349, 399 आणि 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक्सट्रा 1.5 GB डेटा मिळत आहे. त्याचबरोबर कंपनीकडून 300 रुपयांच्या रिचार्जवर 100 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. 300 हून कमी किंमतीचा रिचार्ज केल्यास त्यावर 20% डिस्काऊंट जिओकडून दिला जात आहे.