नवी दिल्ली : रिलायन्स जिओने बाजारात एन्ट्री केल्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली. मग, टेलिकॉम सेक्टरमध्ये प्राईस वॉर आणि डेटा वॉर सुरु झाल्याचं पहायला मिळालं. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लान्स लॉन्च करत आहे आणि या सर्वांचा फायदा ग्राहकांना होत आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांचे प्लान्सही एकमेकांना टक्कर देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही नेमक्या कुठल्या टेलिकॉम कंपनीचा प्लान घ्यावा याबाबत गोंधळलेले आहात? तर मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला एअरटेल आणि जिओच्या प्लान संदर्भात माहिती देणार आहोत. जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा योग्य प्लान ठरवू शकता.


किंमत एअरटेल रिलायन्स जिओ
98  1 GB (10 दिवस)  2 GB (28 दिवस)
149 56 GB (28 दिवस) 84 GB (28 दिवस)
199/198 39 GB (28 दिवस) 98 GB (28 दिवस)
299 84 GB (28 दिवस) 126 GB (28 दिवस)
399 201 GB (84 दिवस) 252 GB (84 दिवस)
448 114 GB (82 दिवस) 294 GB (84 दिवस)
509 126 GB (90  दिवस) 318 GB (91 दिवस)

या ठिकाणी केवळ डेटाच्या आधारावरच प्लान्सची तुलना करण्यात आली आहे. एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता आणि 56 GB डेटा मिळत आहे. तर, त्याच किमतीत जिओ 84GB डेटा देत आहे.


198 रुपयांत एअरटेल 28 दिवसांसाठी 39 GB डेटा म्हणजेच युजर्सला प्रतिदिन 1.4 GB डेटा देतं. तर, जिओ 198 रुपयांत 98 GB डेटा देत आहे. तर, 399 रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेल 201 GB डेटा 84 दिवसांसाठी देत आहे आणि जिओ त्याच किंमतीत 252 GB डेटा देत आहे.


यासोबतच इतरही काही प्लान्स आहेत ज्याचा उल्लेख टेबलमध्ये करण्यात आला आहे. टेलिकॉम कंपन्या केवळ अधिक डेटा उपलब्ध करुन देत नाहीयेत तर अधिक वैधताही देत आहेत. रिलायन्स जिओ इंटरनेट डेटासोबतच अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस आणि जिओ अॅप्स सब्सस्क्रिप्शन देत आहे. तर, एअरटेलही डेटासोबतच कॉलिंग आणि एसएमएस देत आहे मात्र, त्यामध्ये प्रतिदिवसाच्या आधारे मर्यादा देण्यात आली आहे.