नवी दिल्ली : रिलायन्स जिओफायबरने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. रिलायन्स जिओने 'नये भारत का नया जोश' अंतर्गत चार नवीन प्लॅन्स ग्राहकांसाठी आणले आहेत. शिवाय या प्लॅन्सची किंमत देखील परवडणारी आहे. ३९९ रूपये, ६९९ रूपये , ९९९ रूपये  आणि १ हजार ४९९ रूपयांमध्ये रिलायन्स जिओफायबरचे नवीन प्लॅन्स उपलब्ध असणार आहेत. ३० दिवसांसाठी ग्राहकांना ही सेवा फ्रीमध्ये अनुभवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओफायबरचा ३९९ आणि ६९९ रूपयांचा प्लॅन 
रिलायन्स जिओफायबरच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० एमबीपीएस स्पीडनुसार अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. शिवाय ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा देखील आनंद घेता येणार आहे.  ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबीपीएस स्पीडनुसार अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. शिवाय ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा देखील आनंद घेता येणार आहे. 


रिलायन्स जिओफायबरचा ९९९ आणि १ हजार४९९ रूपयांचा प्लॅन 
९९९ आणि १ हजार४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ११ ओटीटी प्लॅटफॉमचा समावेश असणार आहे. ९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १५० एमबीपीएस स्पीडसोबत १ हजार रूपयांमध्ये ११ ओटीटी ऍप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 


त्याचप्रमाणे १ हजार४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ३०० एमबीपीएस स्पीडसोबत १ हजार ५०० रूपयांमध्ये १२ ओटीटी ऍप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. रिलायन्स जिओफायबर जिओचे हे नवे प्लॅन १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.