Online Shopping : घरात बसून मागवा किराणा सामान, फक्त `या` नंबरवर HI पाठवा
तुम्ही आता घरात बसून WhatsApp च्या माध्यनातून थेट सामन खरेदी करु शकणार आहे. तसेच, ग्राहकांना मोफत सामानाची डिलिव्हरी होईल व खरेदीसाठी कोणत्याही ठराविक रक्कमेची अट नसेल.
Reliance JioMart: अनेकदा धावपळीच्या जीवनात आपल्याला हवीतशी खरेदी करता येत नाही. तर काहीवेळेस एखादी वस्तू तरी आपण बाजारातून विकत घेयायला विसरतो. मात्र आता अस होणार नाही. कारण तुम्ही आता घरात बसून WhatsApp च्या माध्यनातून थेट सामन खरेदी करु शकणार आहे. तसेच, ग्राहकांना मोफत सामानाची डिलिव्हरी होईल व खरेदीसाठी कोणत्याही ठराविक रक्कमेची अट नसेल.
आता ग्राहकांना JioMart वरुन सामान खरेदीसाठी थेट WhatsApp चा उपयोग करता येणार आहे. यामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला जोरदार टक्कर मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना मोफत सामानाची डिलिव्हरी होईल व खरेदीसाठी कोणत्याही ठराविक रक्कमेची अट नसेल.
मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सॲपवर JioMart सोबत End-to-End Shopping Experience आणण्यासाठी पार्टनरशीप केली आहे. ग्राहक आता या ॲपद्वारे ग्रोसरी कॅटलॉग वरून वस्तूची निवड करू शकतील. तसेच व्हॉट्सॲप चॅट सोडून JioMart वर पेमेंट सुद्धा करू शकतील. जर तुम्हाला जिओच्या या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. तर खालीलप्रमाणे प्रोसेस करा.
WhatsApp वरून JioMart वर खरेदीसाठी या स्टेप्सला फॉलो करा
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा आमि JioMart नंबर 7977079770 वर "Hi" पाठवा.
- आता तुम्हाला "Get Started" ऑप्शन सोबत एक शुभेच्छा संदेश दिसेल.
- आता “View Catalogue” वर टॅप करा.
- आता आपला Pin Code टाका.
- आता तुम्ही आपल्या आवडते फळ, भाजीपाला, पेय पदार्थ, पर्सनल केयर, आणि अन्य प्रोडक्ट पाहू शकतात.
- आता कार्ट मध्ये आपल्या पसंतीच्या वस्तू जोडण्यासाठी "+" आयकॉनवर टॅप करा.
- एकदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वर दिलेल्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर टॅप करून कार्ट मध्ये जावू शकता किंवा स्क्रीनच्या खाली "View Cart" ऑप्शनवर टॅप करू शकता.
- संकेत मिळाल्यानंतर आता तुम्ही आपला पत्ता देवू शकता. पेमेंट मोड निवडू शकता. जसे कॅश ऑन डिलिव्हरी, पे ऑन जिओ मार्ट, पे ऑन व्हॉट्सॲप यासारखे.
- आता पेमेंट करू शकता. तुमचे सामान तुमच्या पत्तावर पोहोचले जाईल.