रिलायंस जियो फोनच्या डिलेव्हरीला होणार उशीर!
जियो युजर्स बहूप्रतिक्षित जियोफोनसाठी पुन्हा प्री बुकिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे.
मुंबई : जियो युजर्स बहूप्रतिक्षित जियोफोनसाठी पुन्हा प्री बुकिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे.
पण आता ही प्रतिक्षा अजुनच लांबण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआरच्या जियो रिटेलर्सच्या माहितीनुसार, जियोफोन लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अजून काही दिवसांचा काळ लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जियोफोन उपलब्ध होणार होता पण आता जियोफोन लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
मागणी अधिक !
प्री-बुकिंग केलेल्या जियो फोनची डिलेव्हरी १० सप्टेंबरच्या आधी करणं शक्य नाही. कारण या फोनची मागणी प्रचंड प्रमाणात झाली आहे. २४ ऑगस्टपासून या फोनच्या प्री बुकिंगला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या दोन दिवसांतच ग्राहकांची मागणी पाहता हे बुकिंग मध्येच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कशी होते प्री बुकिंग
५०० रुपयात प्री बुकिंग आणि डिलेव्हरीच्या वेळेस उर्वरीत १००० रुपये देऊन बुकिंग करायची सोय होती. सिक्युरिटी मनी ३ वर्षानंतर पुन्हा मिळू शकतात. पण १५०० रूपये परत घेण्यासाठी फोनही परत देणं गरजेचे आहे.