नवी दिल्ली: रिलायन्स दूरसंचार कंपनी बाजारात दाखल झाल्यापासून नेहमी ग्राहकांना आकर्षित करते आहे. ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ काय नवीन ऑफर घेऊन येते आहे, यावर अनेकांचे लक्ष असते. ग्राहकांना भरभक्कम सूट देऊन जिओने दूरसंचार क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले. रिलायन्स जिओने प्रीपेड ग्राहकांचा विचार करुन नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. जिओने प्रीपेड ग्राहकांसाठी २९७ आणि ५९४ रूपयांचे असे २ प्लॅन लॉन्च केले आहेत. नवीन प्लॅन लॉन्च झाल्यावर याचा फटका इतर दूरसंचार कंपन्यांना होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


२९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन 



रिलायन्स जिओने २९७ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमि़टेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा दिली आहे. ग्राहकांना प्रतिदिन ५०० एमबी ४जी डेटा आणि ३०० एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लॅन अंतर्गत जिओ ऍपचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. 


 


५९४ रुपयांचा प्रीपेड प्लॉन



रिलायन्स जिओने ५९७ रुपयांच्या प्लॅनमधील कालावधी वाढवला आहे. ग्राहकांना प्रतिदिन ५०० एमबी ४जी डेटा आणि ३०० एसएमएस मिळणार आहे. मर्यादित डेटा समाप्त झाल्यास ग्राहकांना ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये १६८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राहकांना या प्लॅन अंतर्गत जिओ ऍपचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.