मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आता ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जिओने प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ग्राहकांना आता जास्तीचे पैसे आकारून प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने ग्राहकांना धक्का देत एक प्लॅन बंद केला होता. ही योजना JioPhone वापरकर्त्यांसाठी होती. कंपनीने 749 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला होता. याऐवजी ग्राहकांना JioPhone प्रीपेड 899 रुपयांच्या प्लॅनचा पर्याय दिला होता. हा प्लॅन 150 रुपयांनी महाग आहे. त्यामुळे आता जुन्या ऑफरसह तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर अतिरीक्त 150 रूपये भरावे लागणार आहे.  


TelecomTalk च्या अहवालानुसार, Reliance Jio आपल्या JioPhone वापरकर्त्यांसाठी Rs 749 आणि Rs 899 चे दोन प्लॅन ऑफर करत आहे. दोन्ही प्लॅनमध्ये समान फायदे आहेत. पण, आता 749 रुपयांचा प्लॅन बंद केल्यानंतर यूजर्सकडे फक्त 899 रुपयांच्या प्लॅनचा पर्याय आहे. JioPhone चा हा प्रीपेड प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःसाठी दीर्घ मुदतीचा प्लॅन घ्यायचा आहे. 


प्लॅनमध्ये काय? 
JioPhone च्या 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा दिला जातो. वापरकर्त्यांना दर 28 दिवसांनी 2GB हायस्पीड डेटा दिला जातो. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत घसरतो.
या प्लॅनची एकूण वैधता 336 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सना 28 दिवसांचे 12 सायकल मिळतात. ज्यामध्ये प्रत्येक सायकलमध्ये 50 SMS आणि 2GB डेटा दिला जातो. याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही दिले जाते. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्सचा पर्याय मिळतो.