Rezvani Armoured Car: रेझवानी मोटर्स कंपनीनं मिलिटरी ग्रेड एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीला Rezvani Vengeance असे नाव देण्यात आले आहे. गाडी पाहता क्षणी नजर खिळून राहते. आर्मी टँक आहे की एसयूव्ही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ ग्लास, बॉडी आर्मर, रन-फ्लॅट मिलिटरी टायर, स्मोक स्क्रीन, अंडरसाइड एक्सप्लोसिव्ह प्रोटेक्शन आणि नाइट व्हिजनसह आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी 7 बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, हायपोथर्मिया किट आणि गॅस मास्क पॅकेजही या वाहनात ठेवण्यात आले आहे. या गाडीला तीन इंजिन पर्याय दिले आहेत. सुपरचार्ज्ड केलेले 6.2-लिटर V8, नॅच्युरल एस्पिरेटेड 6.2-लिटर V8 आणि 3.0L Duramax डिझेल इंजिन दिले आहेत. या गाडीमध्ये 8 लोकांना बसण्याची क्षमता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेझवानी वेंजन्समध्ये मस्क्युलर डिझाइनसह 22 इंच आणि 35 इंच टायर मिळतात. मागील बाजूस एक मोठा एलईडी लाइट बार आहे. हे वाहन एक्झिक्युटिव्ह सीटिंग पॅकेजसह येते. यात 2 रिक्लाइनिंग सीट्स, एक मोठा एलईडी टीव्ही आणि स्टार-नाईट हेडलाइनर आहे. यात 14.2-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 16.9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते.


Car मध्ये असलेल्या 'या' बटणाचा नेमका वापर कधी होतो? जाणून घ्या


कारचा आकर्षक लूक पाहून गाडी विकत घेण्याची इच्छा झाली असेल तर एकदा किंमत वाचा. या बॉम्बप्रूफ एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 249,000 डॉलर्स म्हणजेच रु. 2.04 कोटी आहे. ही किंमत 630,000 डॉलर्ल म्हणजेच रु. 5.17 कोटींपर्यंत जाऊ शकते.