मुंबई : रिलायन्स जिओनं आज टेलिकॉम बाजारात आणखी एक धमाकेदार ऑफर बाजारात आणलीय.. आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्ट फोन जिओनं बाजारात आणलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या पंधराशे रुपयात हा स्मार्ट फोन ग्राहकांना मिळणार असून...हे पंधराशे रुपये तीन वर्षानंतर ग्राहकाला परत देण्यात येतील.  त्याशिवाय रिलायन्स जिओच्या फोनवर अनलिमिटेड डेटा मोफत देण्यात येणार आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानींनी यासंदर्भातली घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून या बम्पर ऑफरची सुरूवात होणार आहे. सर्वच भारतीयांना हा फोन 'फ्री'मध्ये मिळणार असल्याची घोषणा यावेळी अंबानी यांनी केलीय. सप्टेंबरपर्यंत देशात जिओचे १० हजार सेंटर असतील. जिओ येत्या वर्षभरात भारताच्या ९९ टक्के जनतेपर्यंत पोहचलेली असेल, असा दावाही अंबानींनी यावेळी केलाय.  


गेल्या वर्षीच्या वार्षिक सभेत 'रिलायन्स जिओ' सादर करत अंबानींनी दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. १७० हून कमी दिवसांत जवळपास १०० मिलियन ग्राहक जोडण्याचा रेकॉर्ड जिओनं बनवलाय... प्रति सेकंदाला ७ ग्राहक... म्हणजेच फेसबुक, व्हॉटसअप आणि स्काईपहूनही जलद गतीनं ग्राहक जोडले... असंही अंबानी यांनी म्हटलंय. आज जिओकडे १२५ मिलियन ग्राहक आहेत. 


जिओच्या ४ जी फिचर फोनची वैशिष्ट्यं... 


- टचस्क्रीन शिवाय असणाऱ्या या फोनमध्ये अल्ट्रा-अपोर्डेबल फोरजी वोल्ट असेल


- जिओच्या नेटवर्कवरच हा फोन उपलब्ध असेल


- यात इंटरनेट टिथरिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि जिओ कंटेंट सारखे व्हिडिओ पाहण्यासची सुविधा असेल.


- या हँडसेटवर सबसिडीही दिली जाईल आणि कस्टम ओएस आणि अॅप मार्केटप्लेसची सुविधाही मिळेल


- भारतीय भाषांच्या वापरासाठी यात डिजिटल व्हॉईस फिचरही असेल


- २.४ इंचाचा कलर डिसप्ले असेल


- ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोअरेज असेल... मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल


- या फिचर फोनमध्ये ड्युएल नॅनो सिमचा स्लॉट असेल


- २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा


- यात २००० mAH बॅटरीसोबत एफएम रेडिओ आणि ब्लूटूथ ४.१ सारखे फिचर असतील