नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना कस्टमाईज करून विकणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी कारबेरी मोटरसायकल्सने भारतात एक नवीन दमदार बाईक लॉन्च केलीये. ही या कंपनीची पहिली मेड इन इंडिया बाईक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘डबल बॅरल’ या नावाने लॉन्च करण्यात आलेल्या या बाईकची एक्स शोरूम किंमत ७.३७ लाख रूपये इतकी ठेवण्यात आलीये. या बाईकमध्ये रॉयल एनफिल्ड बाईकमधील १ हजार सीसीचं इंजिन लावण्यात आलंय. हे नवं इंजिन ५०० सीसी रॉयल एनफिल्डचे दोन इंजिनांना एकत्र करून तयार करण्यात आलंय. 


भारतात कारबेरीने गेल्यावर्षी प्रॉडक्शन सुरू केलंय. वेगवान आणि दमदार बाईक्सच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही बाईक तयार करण्यात आलीये. या युनिक बाईकची बुकींग सुरू झाली आहे. १ लाख रुपयांचे टोकन देऊन ही बाईक बुक केली जाऊ शकते. या बाईकची डिलेव्हरी पुढील ५ ते ६ महिन्यात सुरू होईल. 


या बाईकमध्ये ५५ डिग्री V-Twin इंजिन ड्यूअल कार्बोरेटर सेटअपचं दिलं आहे. तर या बाईकचं फ्यूअल व्हर्जन सुद्धा भविष्यात लॉन्च केलं जाऊ शकतं. या बाईकमध्ये जे इंजिन लावण्यात आलंय, ते ५३ पीएसची पावर आणि ८२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवतं. यात ५ स्पीड गिअरबॉक्स, ७ प्लेट क्लच असेंबली आणि मजबूत चेन ड्राईव्ह दिली आहे. 


ही बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेटच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. हे इंजिन सेप्रेटली वेगळ्या बाईकसाठी खरेदी केली जाऊ शकत नाही. यात रिअर डिस्क ब्रेक आणि एबीएस म्हणजे अ‍ॅंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सुद्धा देण्यात आलंय. 


या दमदार बाईकची स्पर्धा भारतात Triumph Bonneville Street Twin आणि Harley-Davidson Iron 883 या बाईकसोबत होऊ शकते. या बाईक्सची सुद्धा किंमत याच रेंजमध्ये आहे.