Royal Rnfield : भारतीय Auto सेक्टरमध्ये आणि त्यातही Bikes च्या दुनियेत गेल्या कित्येक वर्षांपासून काही नव्या ब्रँड्स आणि मॉडेलची एंट्री झाली. पण, या साऱ्यामध्ये रॉयल एनफिल्डचं स्थान मात्र कायम राहिलं. त्यातही अॅडव्हेंचर बाईक राईडची आवड असणाऱ्यांकडून एनफिल्डच्या 350cc बाईक्सना विशेष पसंती मिळाली. यामध्ये अग्रस्थानी राहिली बुलेट 350 आणि क्लासिक 350. पण, काहींचा मात्र इथंही गोंधळ उडताना दिसतो. कारण, बऱ्याचदा त्यांना घ्यायची असते क्लासिक 350 आणि माहिती मिळवली जाते बुलेट 350 ची. त्यामुळं सर्वप्रथम या दोन्ही बाईक्समधी फरक समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं. (royal Enfield bullet 350 vs classic 350 diffrence features best price and deals) 


Bullet 350 Vs Classic 350 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलेट 350 च्या तुलनेक क्लासिक 350 ही अतिशय अद्ययावत आणि Premium दिसते. शिवाय क्लासिकमध्ये स्प्लिट सीट सेटअप, न्यू पेंट स्कीम आणि उत्तम एलिमेंट्स देण्यात आले आहेत. शिवाय बुलेट 350 च्या तुलनेत क्लासिक 350 मध्ये वायर कनेक्शन्सही कमीत कमी पाहायला मिळतं. तर, बुलेट 350 टियरड्रॉप फ्यूल टँक, सिंगल पीस सीट आणि एका वर्तुळाकार हेडलँपसह रॉयल एनफिल्डच्या मूळ लूकबाबतच्या अपेक्षा पूर्ण करते. 


हेसुद्धा वाचा : 'या' आहेत Top 5 110cc Scooters, बजेटसह मायलेजही कमाल


इंजिनबाबत सांगावं तर, क्लासिक 350 मध्ये J प्लॅटफॉर्म इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामधून 6,100rpm वर 20.2bhp आणि 4,000rpm वर 27nm टॉर्क जनरेट होतो. बुलेट 350 मध्ये  एयर-कूल्ड 346cc च्या इंजिनमध्ये 5,250rpm वर 19.1bhp पॉवर 4,000rpm वर 28nm इतकं पीक टॉर्क मिळतं. 


फिचर्सच्या बाबतीत क्लासिक 350 मध्ये Fuel Gage आणि डिजिटल रीडआऊटसोबत एक इंन्स्ट्रुमेंट क्लस्टरही देण्यात येतं. मोबाईल डिवाईज चार्ज करण्यासाठी युएसबी पोर्ट आणि पर्यायी ट्रीपर नेविगेसन सिस्टीमसुद्धा या बाईकमध्ये देण्यात आली आहे. बुलेट 350 मध्ये मात्र तुलनेनं कमी फिचर्स असून, या बाईकमध्ये अॅनालॉग स्पीडोमीटर आणि अॅम्प मीटर देण्यात आलं आहे. 


Bullet 350 Vs Classic 350 या दोन्ही बाईक्सची किंमत 


रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 ची किंमत 1.90 लाख रुपयांपासून 2.21 लाख रुपयांच्या घरात आहे. तर, बुलेट 350 ची किंमत 1.51 लाख रुपयांपासून 1.66 रुपयांच्या घरात आहे. एक्स शोरूम दरांची तुलना केल्यास बुलेटच्या तुलनेत क्लिसिकची किंमत जास्त असल्याचं लक्षात येतं. कारण, ही एक न्यू जनरेशन बाईक आहे. तर, येत्या काही दिवसांमध्ये भारतात न्यू जनरेशन बुलेट 350 सुद्धा लाँच होणार आहे. त्यामुळं बुलेट घ्यायच्या विचारात असाल तर, थोडी प्रतीक्षा कराल तर उत्तम.