Royal Enfield Electric Bike: मागील काही वर्षांमध्ये भारतीय ऑटो (Auto News) क्षेत्रामध्ये दुचारी वाहनांची मागणी प्रचंड वाढली असल्याचं पाहायला मिळालं. मागणी वाढल्यामुळं विविध कंपन्यांनीही ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेत त्या अनुषंगानं दुचाकीच्या विविध मॉडेलची निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच सध्या चलती आहे ती म्हणजे इलेक्ट्रीक बाईकची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंधनाची होणारी बचत, पर्यावरणस्नेही गुणधर्म अशा कैक गोष्टींमुळे इलेक्ट्रीक वाहनांना अनेक वाहनप्रेमी पसंती देतात. याच यादीत आला अनेकांच्याच पसंतीच्या रॉयल एनफिल्डचीही एन्ट्री झाली आहे, कारण Electric Vehicle च्या क्षेत्रात एनफिल्डनंही ग्रँड एन्ट्री घेतली आहे. 


इटलीतील मिलान इथं आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शो सुरू होण्यापूर्वी एनफिल्डनं पहिल्या इलेक्ट्रीक बाईकच्या रेंजवरून पडदा उचलला आहे. Flying Flea असं ना या बाईकच्या सब्सिडियरीला देण्यात आलं असून, सर्वप्रथम C6 हे मॉडेल लाँच करण्यात आलं आहे.


एनफिल्डच्या या इलेक्ट्रीक व्हीकलच्या सब्सिडियरीच्या नावाची प्रेरणा 40 च्या दशकात सादर करण्यात आलेल्या फ्लाईंग फ्ली या जुन्या मॉडेलपासून घेम्यात आली आहे. एनफिल्डच्या इतर  बाईकपेक्षा या इलेक्ट्रीक बाईकला पूर्ण नवा लूक देण्यात आला आहे. स्टायलिंगमध्ये ही बाईक रेट्रो दिसत असली तरीही कंपनीनं तिला अतिशय आधुनिक रुपात सादर केलं आहे. या बाईकचा लूक लो स्लंग बॉबर मोटरसायकलसारखा असून, त्यामध्ये रेक आऊट फ्रंट , सोलो सॅडल देण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : आता विमानातही वापरता येणार WiFi; नवा नियम तुमच्याच फायद्याचा 


C6 ची फ्रेम फोर्ज्ड अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आली आहे. बाईकमध्ये नवा स्वीचगियर, ऑल एलईडी लायटिंग आणि हटके हेडलाईट देण्यात आली आहे. मागे आणि पुढे डिस्क ब्रेक असणारी ही बाईक शहरी वापरासाठी उत्तम पर्याय असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. सध्या कंपनीनं सोलो सीटर म्हणजेच एका व्यक्तीची आसनव्यवस्था असणारी बाईक लाँच केली असली तरीही यामध्ये पिलियन रायडर सीटचाही पर्याय दिला जात आहे. या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही, पण तिचा लूक मात्र बाईकप्रेमींच्या मनात घर करताना दिसत आहे हे खरं.