ओ हो हो...Royal Enfield च्या बहुप्रतिक्षित Himalayan 452 ची पहिली झलक पाहिली?
Royal Enfield Himalayan 452 First Look: तुम्हाला इथं जुन्या आणि नव्या हिमालयनमध्ये नेमके कोणते फरक दिसतायत? काय आहे या बाईकची किंमत?
Royal Enfield Himalayan 452 First Look: बाईकप्रेमी म्हटलं की काही गोष्टी अगदी साचेबद्ध पद्धतीनं समोर येतात. काही ब्रँड्सच्या बाईकना सर्वांचीच पसंती मिळते. काही ब्रँड तर, अनेक दशकांपासूनच बाईकप्रेमींच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत. यातलं एक म्हणजे Royal Enfield.
रायडिंग आणि त्यातही अॅडव्हेंचर रायडिंगची आवड असणाऱ्या अनेकांनाच Royal Enfield नं दूर कुठंतरी भटकंतीसाठी जायचं असतं. खाचखळगे असणाऱ्या रस्त्यांवर या मंडळींना बाईक चालवत एक प्रकारचा थरार अनुभवायचा असतो. अशाच बाईकप्रेमींसाठी एनफिल्डनं कायमच त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या बाईक्सचे मॉडेल सादर केले आहेत.
यावेळीसुद्धा कंपनीकडून पुन्हा एकदा अशाच एका बाईकचा नजराणा Bike Lover साठी सादर करण्यात आला आहे. थोडक्यात एनफिल्डकडून त्यांच्या लोकप्रिय अशा Himalayan 452 या बाईकचा फर्स्ट लूक सर्वांसमोर आणला गेला आहे. Auto क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार ही बाईक नोव्हेंबर महिन्यात लाँच केली जाऊ शकते. येणारे सणवारांचे दिवस आणि ग्राहकांची उत्तमोत्तम गोष्टी खरेदी करण्याची मानसिकता लक्षात घेता कंपनी याच काळात हे लक्ष्य साधू शकते.
हिमालयातच साकारलेली Himalayan 452
X च्या माध्यमातून कंपनीनं नुकतीच हिमालयन 452 च्या नव्या व्हेरिएंटचा लूक सर्वांसमोर आणला आहे. अधिकृतपणे हीच बाईकची पहिली झलक असून, ती सर्वांच्या भेटीला आतानाच कंपनीनं Buit by the himayas अशी टॅगलाईन वापरत बाईकचा लूक लाँच केला आहे. बाईकच्या मागं उंचच उंच हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत आहेत.
बाईकच्या फिचर्सबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण, तिचं इंजिन 452 सीसी चं असून, तिचा लूकही जुन्या हिमालयनपेक्षा बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मोठा फ्यूल टँक, रिडिझाईन फेंडर्स, स्लिप्ट सीट सेटअप देण्यात आला आहे. बाईकचा साईड पॅनल, रिअर फेंडर आणि फ्यूल टँक अशी ठिकाणं आहेत जिथं ग्राफिक्स देत बाईकचा लूक आणखी उठावदार करण्यात आला आहे. तेव्हा आता फर्स्ट लूकनंतर ही बाईक मार्केटमध्ये लाँच कधी होते याचीच प्रतीक्षा बाईकप्रेमींना लागली आहे.