Royal Enfield च्या बाइकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तरूणांना पाडतेय भूरळ
Royal Enfield च्या नवीन बाइकची इतकी चर्चा का रंगलीय? काय आहेत फिचर्स?
मुंबई : रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) बाईक खरेदीदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहेत.आता रॉयल एनफिल्ड कंपनी 650 सीसी सेगमेंटमध्ये एक नवीन बाइक आणत आहे, ज्याचा अधिकृत टीझर रिलीज झाला आहे. या नवीन बाइकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या बाईकची तरूणांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.
बाइकचे नाव काय?
रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield) या क्रूझर बाईकचे नाव Super Meteor 650 आहे. ही कंपनी पुढील आठवड्यात मिलान, इटली येथे होणाऱ्या EICMA मोटरसायकल शोमध्ये सादर करणार आहेत. म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता ही बाईक प्रथमच जगासमोर सादर केली जाणार आहे.
फिचर्स काय?
या बाईकच्या फिचर्सवर नजर टाकूयात. 650 सीसी इंजिनमध्ये ही कंपनीची तिसरी बाईक असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड (Royal Enfield) आधीच त्यांच्या कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650 सारख्या बाइक्स विकत आहे. यामध्ये पिरेली फँटम स्पोर्ट्सकॉम्प टायर देण्यात आले आहेत. टीझर इमेज बाईकच्या इन्स्ट्रुमेंट कॅस्टरची झलक देखील देते, जे जवळजवळ Meteor 350 सारखेच आहे. म्हणजेच, यात तुम्हाला ट्रिप संबंधित माहितीसाठी अॅनालॉग स्पीडोमीटर आणि डिजिटल मीटर देखील मिळेल.
इंजिन आणि कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, याला 648 cc फ्युएल-इंजेक्टेड, 4-स्ट्रोक, पॉवरसाठी पॅरलल-ट्विन एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 47 bhp कमाल पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. यात 6-स्पीड गिअरबॉक्स मिळू शकतो. आता कंपनी आपली चेसिस बदलते की नाही हे पाहणे बाकी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Super Meteor 650 पहिल्यांदा भारतात लॉन्च होईल. 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार्या रायडर मॅनियामध्ये कंपनी त्याचे प्रदर्शन करू शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे. लॉन्चबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, या वर्षी डिसेंबर महिन्यात किंवा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लॉन्च केले जाऊ शकते. या बाईकची आता तरूणांना उत्सुकता लागली आहे.