अर्ध्या किंमतीत व्हा Bullet चे मालक, Royal Enfield करणार सेकंड हँड बाईक्सची विक्री; जाणून घ्या कशी खरेदी करायची?
Royal Enfield Reown च्या माध्यमातून उपलब्ध बाईकची सर्व्हिस अधिकृत रॉयल एनफिल्ड डीलर्सच्या माध्यमातून केली जाईल. यानंतर बाईकचा दर्जा तपासल्यानं त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाणार.
जर दुचाकी चालवण्याची आवड असेल तर आयुष्यात कधीतरी Royal Enfield ची बाईक विकत घ्यायची हे स्वप्न पाहिलं नसेल अशी व्यक्ती सापडणं तसं कठीणच. याचं कारण Royal Enfield ही फक्त बाईक नाही तर भावना आहेत. या बाईकवर बसल्यानंतर एकदम राजेशाही थाटात जात असल्यासारखं वाटतं. हौस म्हणा किंवा शायनिंग मारण्यासाठी म्हणा...पण Royal Enfield चा मालक होण्याची प्रत्येकाच इच्छा असते. पण Royal Enfield ची किंमत इतर दुचाकींच्या तुलनेत जास्त असल्याने प्रत्येकालाच ती परवडत नाही.
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक असणाऱ्या 'Hunter 350' ची सुरुवातीची किंमत 1.50 लाख आहे. तर नोएडामध्ये ऑन रोड किंमत 1 लाख 70 हजारांपर्यंत पोहोचते. पण आता Royal Enfield च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. याचं कारण कंपनी आता सेकंड हँड बाईक्सच्या व्यावसयात प्रवेश करत आहे. Royal Enfield ने रीओन (Reown) नावाने हा नवा कार्यक्रम सुरु केला आहे. याअंतर्गंत तुम्ही नव्या, जुन्या बाईक्सची खरेदी, विक्री करु शकता.
Royal Enfield ने यासाठी एक अधिकृत वेबसाईट लाँच केली आहे. येथे युजर्स आपल्या आवडत्या बाईक्सची खरेदी करु शकतात, तसंच जुन्या बाईक्स अत्यंत सहजपणे विकू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा हा असेल की, तुम्हाला Royal Enfield च्या बाईक्स खरेदी करण्याची संधी मिळेल. जिथे बाईकची योग्य किंमत, सर्व कागदपत्रं आणि वॉरंटी मिळेल.
बाईकची खरेदी कशी करायची?
जर तुम्हाला Royal Enfield ची बाईक खरेदी करायची असेल तर त्यासाठी वेबसाईटवर जावं लागेल. येथे युजर्स आपल्या लोकेशनच्या आधारे आवड्चाय बाईक्सची निवड करु शकतात. या वेबसाईटवर ग्राहकांना लोकेशन, व्हेरियंट, किंमत, मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग वर्ष यांची निवड करण्याचा पर्याय असेल. तुम्ही नोंद केलेल्या लोकेशनवर जितक्या बाईक्स उपलब्ध असतील त्या बेवसाईटवर दाखवल्या जातील.
वेबसाईटवर तुम्हाला बाईकसंबंधी प्रत्येक माहिती मिळेल. बाईक किती किमी धावली आहे, तुम्ही कितवे मालक असाल अशी सर्व माहिती उपलब्ध असेल. येथे तुम्ही बाईक्सची तुलनाही करु शकता. तसंच टेस्ट राइड बूकही करु शकता. तुम्हाला बाईक खरेदी करायची असेल तर हफ्त्यांचाही पर्याय आहे.
Royal Enfield Reown अंतर्गत उपलब्ध बाईकची सर्व्हिस अधिकृत रॉयल एनफिल्ड डीलर्सकडून केली जाईल. तसंच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याआधी क्वालिटी तपासली जाईल.
सेकंड हँड बाईक खरेदी करताना अनेकदा आपल्याला ती किती चांगली आहे, खराब झाली आहे म्हणून विकत असेल का? असे अनेक प्रश्न सतावतात. पण येथे ही चिंता राहणार नाही. याशिवाय रिओनच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या बाईकची वॉरंटी आणि दोन मोफत सर्व्हिस दिल्या जातील.
जर तुमच्याकडे Royal Enfield ची बाईक असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरुन तिची विक्री करु शकतात. सध्या हा प्रोगाम दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नईत उपलब्ध आहे.