Electric Bullet ची जोरदार चर्चा, बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर धावणार 150 किमी
Royal Enfield Bullet Electric Version: बिहारमधील एक कंपनी रॉयल एनफिल्ड बुलेटसारखं इलेक्ट्रिक वर्जन वेबसाईटवर विकत आहे. या वेबसाईटवर इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेटचं इलेक्ट्रिक वर्जन देखील मिळू शकते.
Royal Enfield Bullet Electric Version: पेट्रोल डिझेलची वाढती किंमत पाहता गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढली आहे. ऑटो कंपन्यांनी लोकांची गरज ओळखून एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणल्या आहेत. लोकं ओला, ओकीनावा या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. दुसरीकडे इलेक्ट्रिक बाइक्सची मागणी आहे. ग्राहक स्प्लेंडर आणि रॉयल एनफील्ड बुलेटच्या इलेक्ट्रिक वर्जनची वाट पाहात आहेत. असं असताना बिहारमधील एक कंपनी रॉयल एनफिल्ड बुलेटसारखं इलेक्ट्रिक वर्जन वेबसाईटवर विकत आहे. या वेबसाईटवर इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेटचं इलेक्ट्रिक वर्जन देखील मिळू शकते.
Electric Royal Enfield Bullet
Silveline नावाची कंपनी रॉयल एनफिल्ड बुलेटसारखी दिसणारी इलेक्ट्रिक बाइक विकत आहे. या बाइकला Love Plus असं नाव देण्यात आलं आहे. ही बाइक फक्त 2000 रुपयात बूक करु शकता. यात 72V/48AH बॅटरी दिली गेली आहे. बाइकचा टॉप स्पीड 120 किमी प्रतितास आहे. ही गाडी फुल चार्ज असताना 150 किमीपर्यंत धावू शकते. बाइकची किंमत 1,51,999 रुपये आहे.
Electric Hero Passion Pro
हिरोची पॉप्युलर बाइक पॅशन प्रोचं इलेक्ट्रिक वर्जन देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे. या गाडीला Agni Plus असं नाव देण्यात आलं आहे. या बाइकची किंमत 1,25,999 रुपये आहे. ही बाइक 2000 रुपयात बूक करू शकता. यात 72V/48AH बॅटरी दिली आहे. बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.
बातमी वाचा- Gravton Quanta इलेक्ट्रिक बाइकची चर्चा, 80 रुपयांमध्ये धावणार 800 किमी
इतर इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स
या वेबसाईटवर इतर इलेक्ट्रिक बाइक सुद्धा आहेत. यात Yamaha R15 चं इलेक्ट्रिक वर्जन आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक ऑटो आणि ई-रिक्षाचा समावेश आहे. वेबसाईटवर सर्वात स्वस्त मॉडेल 56 हजार रुपयांना विकलं जात आहे. यात स्लो स्पीड मोपेड असून पूर्ण चार्जवर 70 किमीपर्यंत जाऊ शकते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 2-3 तासांचा अवधी लागू शकतो.