मुंबई :  रशियन सॉफ्टवेअर कंपनी इन्फोवॉच ग्रुपने 'सर्व्हिलांस-प्रूफ' आपला टैगो स्मार्टफोन बाजारात आणत आहे. याची किमत १६,९०० रुपये आहे. कंपनीने दावा केलाय की, ग्राहकाला गोपनीयतेच संरक्षण मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियन वन 'टैगो' चे प्रतिनिधीत्व करण्यासाठी फोनचा रंग हिरवा आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ इंच टचस्क्रीन, दोन सिम स्लॉट्स आणि एक ड्युअल कॅमेरा आहे. आता रशियन फोन कंपनी बाजारात सर्वात मोठी धम्माल उडवून देईल. प्रामुख्याने चीनला हा फोनचा जास्त धोका आहे. कारण चीनी कंपन्या या  फोनचे कोणतेही फिचर्स तयार करु शकत नाही. याचे कारण टैगोमधील वैशिष्ट्ये अद्याप कोणत्याही चीनी फोनमध्ये नाहीत. 


जर भारतीय बाजारपेठेतील रशियन कंपनीने पाऊल टाकले तर हे रशियन उत्पादन हातोहात संपेल किंवा घेतले जाईल. टैगो फोनची वैशिष्ट्य म्हणजे आयफोन पेक्षा त्याची फिचर्स चांगली आहेत आणि किंमत आयफोन पेक्षा खूप कमी आहे.