मुंबई : खेळण्यांमुळे ६ वर्षांचा रेयान कोट्यधीश झाला आहे. रेयान याला आता जगातली प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्टनं ब्रॅण्ड केलं आहे. रेयान नावाच्या या मुलाला मागच्या वर्षी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यामुळे ११ मिलियन डॉलर म्हणजेच ७५ हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. यूट्यूबवर रेयानचे ६ चॅनल आहेत. या चॅनलवरच्या व्हिडिओंना जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त जणांनी बघितलं आहे. मागच्या वर्षी हा मुलगा यूट्यूबवर आठवा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. तर यूट्यूबवर एवढी कमाई करणारा तो सगळ्यात लहान कोट्यधीश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ वर्षांचा रेयान यूट्यूबवर खेळण्यांचा रिव्ह्यू करतो. आता वॉलमार्टनं रेयानसोबत करार केला आहे. या करारानुसार वॉलमार्ट अमेरिकेमध्ये त्यांच्या २५०० स्टोअर्समध्ये रेयानच्या ब्रॅण्डची खेळणी विकणार आहे. वॉलमार्टनं या ब्रॅण्डचं नाव रायन वर्ल्ड ठेवलं आहे.


रेयान ३ वर्षांचा असल्यापासून यूट्यूबवर खेळण्यांचा रिव्ह्यू करतो. प्रत्येक खेळण्याला बघून त्याला वापरून आणि समजून रेयान या खेळण्याबद्दल छोट्यात छोटी माहिती देतो.