Samsung Galaxy Z Fold 4 की Xiaomi Mix Fold 2, दोघांपैकी बेस्ट कोणता? फीचर्स बघून तुम्हीच ठरवा
Samsung Galaxy Z Fold 4 शी सामना करायला बाजार Xiaomi Mix Fold 2 अवतरला आहे. आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल माहिता सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल...
Xiaomi New Smartphone : शाओमीने नुकताच एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचं नाव म्हणजे Mix Fold 2. कंपनीचा हा दुसऱ्या जनरेशनचा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनला 12GB RAM + 256GB , 1268 RAM + 51268 आणि 1208 RAM + 1TB स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. Xiaomi MIX Fold 2 चा थिकनेस 5.4mm इतका आहे. या स्मार्टफोनचं वजन 262 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi MIX Fold 2 चे स्पेसिफिकेशन्स
50MP Sony IMX766 प्राइमरी सेंसर
1TB पर्यंतचं स्टोरेज
12GB RAM
6.5-इंचचा Samsung E5 AMOLED पॅनल
Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
Xiaomi MIX Fold 2 च्या बाहेरच्या डिस्प्लेला 6.5 इंचचा Samsung E5 AMOLED पॅनल आहे, ज्यामध्ये FHD+ रेजलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. यासोबतच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्सन देखील मिळते. जेव्हा या स्मार्टफोनला अनफोल्ड केलं जातं, तेव्हा इंटिरिअर इको OLED स्क्रीनची साईज 8.2 इंच होते. हा स्मार्टफोन 2.5 रेजलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटवर परफॉर्म करतो.
Xiaomi MIX Fold 2 चा कॅमरा
Xiaomi MIX Fold 2 मध्ये तीन हॉरिजॉन्टल कॅमेरा सेंसर दिले आहेत. यामध्ये 50MP Sony IMX766 प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस आणि 2x झूम असणारा 8MP टेलीफोटो
कॅमेरा आहे.
Xiaomi MIX Fold 2 ची बॅटरी
या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi Mix Fold 2 ची किंमत
Xiaomi Mix Fold 2 या स्मार्टफोनाला सध्या चायनीज मार्केटमध्ये लाँच केलं आहे. या स्मार्टफोनची किंमत 8999 युआन( अंदाजे 1.06 लाख रुपये) इतकी आहे. MIX Fold 2 फोल्डेबल स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु आहे आणि याचा सेल 16 ऑगस्टपासून सुरु आहे.
Samsung Galaxy Z Fold 4, OPPO Find N, आणि Vivo Fold या स्मार्टफोन्सशी सामना करायला Xiaomi MIX Fold 2 हा स्मार्टफोन बाजारात येतोय.