मुंबई : सॅमसंगने आपल्या Galaxy A सिरीज अंतर्गत ३ नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Samsung Galaxy A52, Galaxy A52 5G आणि Galaxy A72 लाँच झालेले आहेत. Galaxy A52 5G मध्ये 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. तर बाकी २ फोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्या फोनची किंमत किती?


     मॉडेल                                              किंमत


Galaxy A52                                ३० हजार २०० रूपये


Galaxy A52 5G                          ३७ हजार १०० रूपये


Galaxy A72                                ३८ हजार ८०० रूपये


 


Samsung Galaxy A52 ची वैशिष्ट्य


हे तिन्ही फोन ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू, ऑसम वॉयलेट, ऑसम व्हाईट या रंगांमध्ये आहेत. या फोनमध्ये अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. यामध्ये 8GB रॅम आहे. याशिवाय कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं, तर 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP डेप्थ सेंसर आणि 5MP मायक्रो कॅमेरा आहे. Samsung Galaxy A52 5G चीही हीच वैशिष्ट्य आहेत.


Galaxy A72 ची वैशिष्ट्य


यामध्येही अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. 8GB रॅमसह ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP मायक्रो कॅमेरा आणि 3X ऑप्टीकल झूम सपोर्ट करणारा कॅमेरा आहे. याशिवाय 8MP टेलीफोटो कॅमेरासुद्धा आहे.